ETV Bharat / state

राज्यातील शाळा 3 ऑगस्टला सुरू होणार - विजय वडेट्टीवार - राज्यातील शाळा 3 ऑगस्टला सुरू होणार गडचिरोली

राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शाळा 3 ऑगस्टपासून सुरू होतील, अशी स्थिती आहे. त्याअगोदर सर्व शाळा सॅनिटाईझ करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे शुक्रवारी दिली.

विजय वडेट्टीवार
विजय वडेट्टीवार
author img

By

Published : Jul 17, 2020, 9:35 PM IST

Updated : Jul 17, 2020, 10:25 PM IST

गडचिरोली : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील शाळा 3 ऑगस्टपासून सुरू होतील, अशी स्थिती आहे. त्याअगोदर सर्व शाळा सॅनिटाईझ करुन घेण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गडचिरोली येथे शुक्रवारी दिली.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात वनहक्क प्रलंबित दाव्यासंदर्भात आज बैठक पार पडली. या बैठकीत ते बोलत होते. सध्याची परिस्थिती बघता सर्व शाळांना मास्क, सॅनिटायझर अशा आवश्यक वस्तू पुरविण्यासाठी तातडीने प्रयत्न करा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना स्थिती प्रशासनाच्या मेहनतीने व जनतेच्या सहकार्याने नियंत्रणात आहे. आता जिल्ह्याबाहेरील सुरक्षा जवान व इतर नागरिकांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्यासाठी 5 कोटी निधी येत्या आठ दिवसात जिल्ह्याला प्राप्त होतील, अशी माहिती त्यांनी दिली.

या बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाचे आमदार, उपविभागीय अधिकारी, वन विभागाचे उपवनसंरक्षक उपस्थित होते.

Last Updated : Jul 17, 2020, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.