ETV Bharat / state

नक्षलग्रस्त गडचिरोलीच्या अहेरीतून 'राष्ट्रवादी परिवार संवाद'यात्रेची सुरुवात - गडचिरोली राष्ट्रवादी बातमी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'राष्ट्रवादी परिवार संवाद' यात्रेची सुरूवात आज (दि. 28 जाने.) गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून झाली आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री जयंत पाटील हे 17 दिवसांत 14 जिल्हे, 82 मतदारसंघ व 3 हजार किलोमीटरचा प्रवास करत विविध समस्यांचा आढावा घेणार आहेत.

जयंत पाटील
जयंत पाटील
author img

By

Published : Jan 28, 2021, 6:35 PM IST

Updated : Jan 28, 2021, 7:08 PM IST

गडचिरोली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 'राष्ट्रवादी परिवार संवाद' यात्रेची सुरूवात आज (दि. 28 जाने.) गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथून झाली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहेरी येथे पहिली आढावा बैठक घेतली. अहेरी, एटापल्ली, शिरोंचा या अतिशय दुर्गम भागातून लोकांनी या संवाद कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. यावेळी पाटील म्हणाले, परिसरातील घटकांना न्याय देण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.

बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल

या भागात जलसंपदा विभागाचे विविध प्रकल्प सुरू आहेत. हे काम जलदगतीने करण्यात यावे व या सर्व योजना 2024 पर्यंत कार्यान्वित कराव्यात, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. मेडिगट्टा धरणाचा विषय गंभीर आहे. काही भागात धरणाचे पाणी शिरले आहे. यात नुकसानभरपाईपासून वंचित असलेल्या लोकांनी आमदार धर्माराव आत्राम यांच्याकडे माहिती द्यावी. जे शेतकरी पात्र आहेत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार प्रयत्न करेल, असे मंत्री जयंत पाटील म्हणाले.

सलग 17 दिवस असणार विदर्भ अन् खानदेश दौरा

राष्ट्रवादी परिवार संवाद निमित्ताने आजपासून सलग 17 दिवस विदर्भ आणि खानदेश दौऱ्यावर जयंत पाटील असणार आहेत. या 17 दिवसांत 14 जिल्हे, 82 मतदारसंघ व 3 हजार किलोमीटरचा प्रवास करत विविध समस्यांचा आढावा मंत्री जयंत पाटील घेणार आहेत. या दौऱ्यात जलसंपदा विभागाच्या प्रलंबित प्रश्नांबाबतही शासकीय बैठका घेतल्या जातील व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचेही मंत्री पाटील म्हणाले.

हेही वाचा - भामरागड तालुक्यातील दुर्गम गावांना जिल्हाधिकाऱ्यांची भेट

Last Updated : Jan 28, 2021, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.