गडचिरोली - प्राणहिता नदीवर दर बारा वर्षांनी भरणारा पुष्कर मेळावा ( Pushkar Melava in Gadchiroli ) येत्या एप्रिलमध्ये संपन्न होणार आहे. याबाबत जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे ( Guardian Minister of Gadchiroli Eknath Shinde Pushkar Melava ) यांनी येथील स्थानिक प्रशासनाबरोबर तसेच जिल्हा प्रशासनाबरोबर तयारीबाबत चर्चा केली. यावेळी त्यांनी पूर्व नियोजनाबाबत आवश्यक निधीसाठी जिल्हा नियोजन मधील १० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले. तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाकडेही प्रस्ताव सादर केला आहे. अतिरिक्त निधी बाबत संबंधित विभागाच्या मंत्र्यांशीही चर्चा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न -
या आढावा बैठकीला जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, जिल्हा परिषद सदस्या तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री आत्राम उपस्थित होत्या.
पुष्कर मेळाव्याबाबत जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू -
पुष्कर मेळाव्यात प्राणहिता नदीवर सिरोंच्या येथील नदी घाटावर तेलंगणा, छत्तीसगड सह महाराष्ट्रातील लाखो भाविक स्नान करण्यासाठी व कालेश्वरम येथील मंदिरात दर्शन घेण्यासाठी हजेरी लावत असतात. एप्रिल महिन्यात होणाऱ्या पुष्कर मेळाव्या बाबत जिल्हा प्रशासनाची तयारी सुरू आहे. येत्या काळात कोणतेही अडचणी भाविकांना येऊ नये म्हणून गतीने कामे केली जाणार आहेत.
हेही वाचा - Russian radio station : युक्रेनची बातमी देणाऱ्या रशियन रेडियो स्टेशनचे प्रसारण बंद