ETV Bharat / state

गडचिरोली-चिमुर मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढला, पोलिसांच्या ‘ऑपरेशन हिम्मत'मुळे निवडणूक यशस्वी - गडचिरोली-चिमुर मतदारसंघ

निवडणूक काळात १० आणि ११ एप्रिलला २ ठिकाणी झालेल्या भूसुरुंग स्फोटात गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफचे प्रत्येकी २ जवान जखमी झाले होते. त्यानंतर त्याठिकाणी तैनात असलेल्या जवानांनी शौर्यपूर्ण कामगिरी बजावत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. यामुळे पोलीस अधिक्षकांनी तैनात असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना रोख स्वरुपात बक्षीस जाहीर केले. एवढेच नाहीतर १५ एप्रिलला वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेतुरी या दुर्गम भागात मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडली.

मतदान केंद्रावर तैनात असलेले पोलीस
author img

By

Published : Apr 16, 2019, 9:30 PM IST

Updated : Apr 16, 2019, 11:18 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी 'ऑपरेशन हिम्मत' राबवण्यात आले होते. पोलिसांनी नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवत हे ऑपरेशन फत्ते करण्यात यश मिळवले. त्यामुळेच गेल्या २०१४ च्या निवणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत अडीच टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

मतदान केंद्रावर तैनात असलेले पोलीस

जिल्ह्यात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतून 'ऑपरेशन हिंमत' राबविण्यात आले होते. या माध्यमातून गडचिरोली पोलीस दलाने जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील ५९१ गावांना ग्रामभेटी दिल्या. ६१ जनजागरण मेळाव्याच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या मनामध्ये जागरुकता निर्माण केली. त्याचबरोबर ८ मार्चला जागतिक महिला दिनानिमित्त शहरात नक्षलवाद विरोधात आणि मतदार जागृतीसाठी तब्बल १२ हजार महिलांच्या सहभागाने ७ ते ८ किमीपर्यंत ‘बेबी मडावी आदिवासी महिला विकास साखळी' साकारण्यात आली. त्याचे यशस्वी आयोजन गडचिरोली पोलिसांनीच केले होते. परिणामी महिलांनी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावला.

मुक्तीपथाच्या साथीने गडचिरोली पोलीस दलाने ‘दारूमुक्त निवडणूक' यशस्वी करण्यात आली. पोलिसांनी या कालावधीत १० हजार ३४० लिटर दारू आणि १ कोटी २४ लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले. याचबरोबर ३४१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तसेच सी-६० चे जवान, जलद प्रतिसाद पथकाचे जवान, विविध पोलीस ठाण्यांत तैनात असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नक्षलवादाविरोधात राबवलेल्या आक्रमक अभियानांमुळे निवडणुकीच्या काळात नक्षलवाद्यांच्या वाढत्या कारवायांवर अंकुश ठेवण्यात यश मिळाले.

Intro:गडचिरोली पोलिसांच्या ‘ऑपरेशन हिंमत'मुळे निवडणूक झाली यशस्वी

गडचिरोली : गडचिरोली पोलीस दलातर्फे जिल्हयातील नक्षलवादाबरोबरच दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांच्या मनात मतदानाविषयची जागृती निर्माण करणे तसेच मुक्तीपथाच्या सोबतीने दारूमुक्त निवडणुक पार पाडण्यासाठी व्युहरचना तयार करण्यात आली होती. या ऑपरेशनची योग्य अंमलबजावणी करत गडचिरोली पोलीस दलाने निवडणुकीत नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवत 'ऑपरेशन हिंमत' फत्ते करण्यात यश मिळवले. याचमुळे सन २०१४ च्या निवडणुकीपेक्षा यावर्षीच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीत २.५ टक्क्यांची वाढ दिसुन येत आहे.Body:जिल्हयात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या यशस्वीतेसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या संकल्पनेतुन 'ऑपरेशन हिंमत' राबविण्यात आले होते. या माध्यमातुन गडचिरोली ऑपरेशन हिंमतच्या माध्यामातुन गडचिरोली पोलीस दलाने गडचिरोली जिल्हयातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील ५९१ गावांना ग्रामभेटी देत मतदानाबद्दल व ६१ जनजागरण मेळाव्याच्या
माध्यमातुन आदिवासी बांधवांच्या मनामध्ये जगरूकता निर्माण केली. त्याचबरोबर ०८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत गडचिरोली शहरात नक्षलवाद विरोधात व मतदार जागृतीसाठी तब्बल १२ हजार महिलांच्या सहभागाने ७ ते ८ किमी पर्यंत साकारलेली
‘बेबी मडावी आदिवासी महिला विकास साखळी'चे यशस्वी आयोजन देखील गडचिरोली पोलीस दलाने करत मोठया प्रमाणावर महिलांमध्ये जागृती घडवून आणली.

याचाच परिणाम म्हणून महिलांनी मोठया प्रमाणावर घरा बाहेर पडुन आपला मतदानाचा हक्क बजावला. याचबरोबर मुक्तीपथच्या साथीने गडचिरोली पोलीस दलाने ‘दारूमुक्त निवडणुक' यशस्वी करत निवडणुक कालावधीत जिल्हयाभरातील विविध पोस्टे, उपपोस्टे, पोम येथ मुंबई दारूबंदी कायदयान्वये १४१ गुन्हयांची नोंद करून १० हजार ३४० लिटर दारू व १ कोटी २४ लाख रू. चा
मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळविले. त्याचबरोबर ३४१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्यात आली. तसेच ६३१ गुन्हेगारांच्या विरोधात न्यायालयाने काढलेल्या नॉन बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी करण्यात आली.
त्याचबरोबर सी-६० चे जवान, जलद प्रतिसाद पथकाचे जवान, विविध पोलीस ठाणे येथे तैनात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी नक्षलवादाविरोधी राबवलेल्या
आक्रमक अभियानांमुळे निवडणुकीचे काळात नक्षलवादयांच्या वाढत्या कारवायांवर अंकुश ठेवुन
निवणुक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्यात मोलाची भुमिका बजावली.

१० व ११ एप्रिल २०१९ रोजी दोन ठिकाणी झालेल्या भूसुरुंग स्फोटात गडचिरोली पोलीस दल व सिआरपीएफ चे प्रत्येकी ०२ जवान जखमी झाले होते. यानंतर देखील तेथे तैनात असलेल्या जवानांनी शौर्यपुर्ण कामगिरी बजावत मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडली. यामुळे
या सर्व अधिकारी व कर्मचा-यांचे कौतुक करत मा. पोलीस अधीक्षक यांनी या मतदान केंद्रावर तैनात असलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना रोख स्वरूपात बक्षीस जाहीर केले आहे. तर 15 एप्रिल रोजी मौजा वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेतुरी या दुर्गम भागात मतदान प्रक्रिया
सुरळीतपणे पार पडले. पोलीस अधीक्षक यांचे संकल्पनेतुन राबविण्यात आलेले ‘ऑपरेशन हिंमत' च्या
यशस्वीतेचे श्रेय गडचिरोली पोलीस दलातील सर्व अधिकारी व, कर्मचारी त्याचबरोबर सिआरपीएफ, एसआरपीएफ, होमगार्ड व इतर जिल्हयातुन बंदोबस्तासाठी आलेले पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना जाते.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आणि sp बलकवडे यांचे कटवेज आहे
Last Updated : Apr 16, 2019, 11:18 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.