गडचिरोली - जिल्ह्यातील मुलचेरा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाट यांच्या पत्नीने स्वतः वर गोळी झाडून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. संगीता शिरसाठ, असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.
हेही वाचा- लाॅकडाऊन: मुंबईहून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या महिलेची नागपुरात प्रसूती...
उपविभाग अहेरी अंतर्गत येणारे मूलचेरा पोलीस ठाणे येथे पोलीस उपनिरिक्षक म्हणून धनराज शिरसाठ कार्यरत आहेत. धनराज यांच्याबरोबर त्यांची पत्नी संगीता, मुलगी भार्गर्वी (वय ९) व मुलगा शुभम (वय ४) यांच्यासह धनराज यांचे आई वडील मुलचेरा येथे वास्तव्यास होते. पोलीस उपनिरीक्षक धनराज शिरसाट हे नक्षलविरोधी अभियान राबवून गुरुवारी मूलचेरा येथे परतले होते. त्यानंतर ते आई-वडिलांसह मूलचेरा येथे कामानिमित्त गेले होते. यावेळी त्यांची पत्नी संगीता व दोन मुले घरीच होती.
दुपारी १२.३० ते १ वाजेच्या दरम्यान संगीता शिरसाट यांनी राहत्या घरात स्वतः वर डोक्यात गोळी मारून घेतली. यावेळी फायरिंगचा आवाज ऐकून व आईने स्वतः वर गोळी मारुन घेतल्याचे पाहून भार्गवीने आरडाआरोड केला. तेव्हा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी गेले. त्यांनी संगीता यांना जखमी अवस्थेत पाहिले. यानंतर त्यांना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, तिथे पोहोचताच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले आहे. त्यांनी आत्महत्या का केली, याचे नेमके कारण स्पष्ट होवू शकलेले नाही. मात्र, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
हत्या केल्याचा भावाचा आरोप..
पती-पत्नी मधील वाद टोकला गेल्याने जळगावच्या विवाहितेवर पीएसआय पतीने दोन गोळ्या झाडून खुन केला. पतीचे अनैतिक संबध होते. त्यास विरोध केल्यामुळे पत्नीस मारुन टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विवाहितेचा भाऊ गणेश सपके यांनी केला आहे. संगीता ही जळगाव शहरातील दगडू माणिक सपके यांची कन्या आहे. नऊ वर्षांपूर्वी धनराज बाबुलाल शिरसाठ (रा.वराड, मुसळी, ता. धरणगाव) याच्या सोबत दिव्याचे लग्न झाले. धनराज हा २००६ मध्ये पोलीस दलात शिपाई म्हणून भरती झाला आहेत. यानंतर पदोन्नती होऊन तो सध्या गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहे.
दरम्यान, जखमी दिव्याचा भाऊ गणेश सपके याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दीड दोन वर्षांपासून सासरच्या लोकांनी दिव्याला त्रास देण्यास सुरुवात केली होती. पती धनराज याचे विवाहबाह्य अनैतीक संबध होते. दिव्या या संबधांना विरोध करीत असल्यामुळे पती धनराज हा तीच्याशी भांडण करीत होता. दोन महिन्यांपूर्वी पती-पत्नी जळगावी आलेले असताना देखील भांडण झाले होते. यावेळी आम्ही धनराज यांची समजूत काढून त्यांना पुन्हा गोडीगुलाबीने संसार करण्यासाठी पाठवले होते. तरी देखील त्याने अनैतिक संबध सोडले नाहीत. दोन दिवसांपासून पती धनराजसह सासू-सासऱ्यांनी दिव्याला मारहाण केली होती. ६ मे रोजी रात्री दिव्याने फोन करुन आपल्याला होणाऱ्या त्रासाची कल्पना आम्हाला दिली होती, अशी माहिती दिव्याचा भाऊ गणेश सपके यांनी दिली.
लहान मुलीने मामाला फोन करुन सांगितली घटना...
धनराज याने दिव्यावर गोळी झाडल्यानंतर परिसरातील नागरिक, पोलीस कर्मचारी घटनास्थळी जमले होते. यावेळी दिव्याची मुलगी भार्गवी (वय ८) ने जळगावात मामा (गणेश सपके) यांना फोन करुन देण्याची मागणी केली. एका कर्मचाऱ्याने फोन लावून दिल्यानंतर दिव्याने मामा गणेश यांना घटनेची माहिती दिली, असे विवाहितेच्या भावाने सांगितले.