गडचिरोली - दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी बांधवांना त्यांच्यासाठी शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती मिळावी, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या सूचनेनुसार भामरागडचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली नक्षलग्रस्त भागातील नारगुंडा गावामध्ये जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आदिवासी बांधवांना विविध योजनांची माहिती देण्यात आली.
विविध साहित्याचे वाटप
नारगुंडामध्ये आदिवासी बांधवांसाठी खास जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात आदिवासी बांधवांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. त्याचप्रमाणे येथील महिलांना रोजगार मिळून देण्याच्या हेतुने शिवणकामाबद्दल देखील माहिती देण्यात आली. ज्या महिला काम करण्यासाठी इच्छुक आहेत अशा महिलांचे दस्तावेज गोळा करण्यात आले. तसेच येथे उपस्थित सर्व नागरिकांची मोफत तपासणी करून, त्यांना योग्य त्या औषधांचे मोफत वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे येथील नागरिकांना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लॅंकेट आणि चिमुकल्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.