ETV Bharat / state

Ajit Pawar Takes Floods Review : संसारावर पाणी, मोलमजुरी करणाऱ्यांनी जगायचे कसे, गडचिरोलीत अजित पवारांचा सवाल - अजित पवार आज पूरग्रस्त गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज पूरग्रस्त गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर गेले आहेत. गडचिरोलीतील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली.

Ajit Pawar Taken Review Of Flood Affected Area In Gadchiroli
विरोधी पक्षनेते अजित पवार
author img

By

Published : Jul 28, 2022, 11:30 AM IST

Updated : Jul 28, 2022, 12:32 PM IST

गडचिरोली - अतिवृष्टीने राज्यातील 10 लाख हेक्चर शेतीचे नुकसान झाले असून एकट्या गडचिरोली जिल्ह्यात 25 हजार हेक्टर शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला आहे. येथील नागरिकांचा संसार खरीपाच्या धानावर अवलंबून आहे, मात्र पीक गेल्याने मोलमजुरी करणाऱ्यांनी जगायचे कसे असा सवालही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारला केला. त्यामुळे एसडीआरएफचे नॉर्मस बाजुला ठेऊन शेतकऱ्यांना भरीव मदत करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

मुसळधार पावसात 12 नागरिकांनी गमावला जीव - मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील पुलावर मोठ्याप्रमाणात पाणी वाहिले. त्यामुळे शेतीचे नुकसान झाले. मुसळधार पावसामुळे 12 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. घरातील कर्ता पुरूष गेल्याने संसार कोलमडून पडला. त्यामुळे अशा आधार गमवलेल्या कुटुंबांना सरकारने भरीव मदत करावी अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

  • गडचिरोली जिल्ह्यातील शिवणे गावात बांधावर जाऊन पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाबाबत शेतकऱ्यांची विचारपूस केली; त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानाचे पंचनामे करून पूरग्रस्तांना आवश्यक ती आर्थिक मदत तातडीनं राज्य शासनाच्या वतीनं करण्यात यावी. pic.twitter.com/yCq4Szubsn

    — Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

घराच्या भींतीला ओलावा आला, त्याचाही पंचनामा करा - मुसळदार पावसामुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे एसडीआरएफचे नॉर्मस बाजुला ठेऊन प्रशासनाने नागरिकांना मदत करायला हवी. 12 नागरिकांचा या पावसाने बळी घेतला आहे. त्यासह शेतकऱ्यांच्या अनेक जनावरांनी आपला जीव गमवावा लागला आहे. त्याचीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला हवी असेही अजित पवार म्हणाले. अनेक नागरिकांची घरे कोलमडून पडली आहेत. त्यांचा संसार उघड्यावर आला आहे. त्यामुळे त्यांना सरकारने मदत करायला हवी. इतकेच नाही तर ज्या घरांच्या भींतीला ओलावा आला त्याचाही पंचनामा करण्याची मागणी अजित पवार यांनी आज गडचिरोलीत केली.

  • गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात पूर आणि अतिवृष्टीबाबतचा आढावा घेतला तसंच त्यावरील उपाययोजनांविषयी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा केली. pic.twitter.com/BT8VrueeOW

खरीप गेला आता रब्बीचे पीक घेता येणार नाही - मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातही खरीप पिकावर विदर्भातील शेतकऱ्यांचा संसार अवलंबून आहे. विशेषता धान पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्याचा खरीप हंगाम गेलाच आहे, आता रबीची पिकेही येणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा संसारच कोलमडल्याचे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

पुलावरुन वाहिले 28 लाख क्युसेक पाणी - मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जोरदार पाऊस झाल्याने विदर्भातील पुलावरुन 28 लाख क्युसेकने पाणी वाहत असल्याचेही अजित पवार म्हणाले.

Last Updated : Jul 28, 2022, 12:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.