ETV Bharat / state

'गोंडवाना'ने परीक्षा पुढे ढकलल्या; 12 ऑक्टोबरपासून होणाऱ्या परीक्षा अडचणींविना पार पाडण्याचे चॅलेंज - गोंडवाना विद्यापीठ परीक्षा गडचिरोली बातमी

गोंडवाना विद्यापीठातील ऑनलाईन परीक्षा इंटरनेटचा घोळ झाल्याने रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली. आता सर्वच परीक्षा पाच दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, 12 ऑक्टोबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सुरू होणाऱ्या परीक्षा अडचणींविना पार पाडण्याचे चॅलेंज विद्यापीठासमोर आहे.

'गोंडवाना'ने परीक्षा पाच दिवस पुढे ढकलल्या

author img

By

Published : Oct 6, 2020, 7:09 PM IST

गडचिरोली - येथील गोंडवाना विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षेला सोमवारी सुरुवात झाली. मात्र, परीक्षेदरम्यान सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण उद्भवल्याने सकाळी 9 वाजताचा पेपर रद्द करत दुपारी 2 वाजता ठेवण्यात आला. तरीही तांत्रिक अडचण दूर न झाल्याने पेपरच रद्द करण्याची नामुष्की विद्यापीठावर ओढवली. आता सर्वच परीक्षा पाच दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, 12 ऑक्टोबरपासून नव्या वेळापत्रकानुसार सुरू होणाऱ्या परीक्षा अडचणींविना पार पाडण्याचे चॅलेंज विद्यापीठासमोर आहे.

'गोंडवाना'ने परीक्षा पाच दिवस पुढे ढकलल्या

कोरोना महामारीमुळे राज्यात पहिल्यांदाच ऑनलाईन परीक्षा पॅटर्न राबविण्यात येत आहे. अंतिम वर्षाच्या विविध 105 अभ्यासक्रमासाठी गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न असलेल्या गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्यातील 212 महाविद्यालयांचे 18 हजार 500 विद्यार्थी परिक्षा देत आहेत. विद्यार्थ्यांना ग्रुप ऑनलाईन परिक्षा द्यायची होती. तर, 11 ठिकाणी ऑफलाईन सेंटर सुरू करण्यात आले होते. सोमवारी सकाळी नऊ ते सव्वा दहाच्या दरम्यान पहिला पेपर होता. मात्र, पहिल्या ऑनलाईन पेपरला अनेक ठिकाणी इंटरनेटमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आणि अनेक विद्यार्थ्यांना वेळेवर लॉगिन करता आले नाही.

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी इंटरनेट सेवेचा मोठा अभाव आहे. येथे भारत दूरसंचार निगम व्यतिरिक्त इतर कोणत्याही खासगी कंपन्यांची इंटरनेट सेवा पोहोचलेली नाही. त्यामुळे दुर्गम भागातील काही ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी वायफायची सुविधा देण्यात आली. विद्यार्थी तिथे सकाळपासून येऊन बसले होते. जवळपास 8 हजार 892 विद्यार्थ्यांचे लॉगिन झाले. या विद्यार्थ्यांनी जवळपास 70 हजार प्रश्न सोडविले. मात्र, काही विद्यार्थ्यांचे लॉगिन न झाल्याने त्यांना परिक्षा देता आली नाही. आता सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या 12 ऑक्टोबरपासून ठरवलेल्या पध्दतीनेच होतील. नवीन वेळापञक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. मात्र, यावेळी तरी परीक्षा निर्विघ्नपणे पार पाडण्याचे चॅलेंज गोंडवाना विद्यापीठासमोर आहे.

हेही वाचा - रोहयो अंतर्गत कुक्कामेटाची निवड, ५ वर्षात कायापलट करण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.