गडचिरोली - जिल्हयात 187 नवीन कोरोनाबाधित आढळून आले. तर 61 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. कोरोनाने चार जणांचा मृत्यू झाला आहे. .
जिल्हयातील कोरोनामुक्त झालेली संख्या 10748 वर पोहचली. सध्या 1,698 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा-मुंबईत कोरोना रुग्णसंख्या घटली; 6 हजार 905 नव्या रुग्णांची नोंद, 43 रुग्णांचा मृत्यू
आजपर्यंत 137 जणांचा कोरोनाने मृत्यू-
जिल्हयात एकूण 137 जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याची नोंद आहे. तर आज झालेल्या चार मृत्यूमध्ये आरमोरी तालुक्यातील 37 वर्षीय पुरुष, धानोरा तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये नागभिड जि. चंद्रपूर येथील एक महिला तसेच मेळघाट लाखांदूर तालुक्यातील जिल्हा भंडारा येथील 43 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हयातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.42 टक्के आहे. तर सक्रिय रुग्णांचे प्रमाण 13.49 टक्के तर मृत्यू दर 1.09 टक्के झाला आहे.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यानी घेतला मुंबईमधील कोरोना परिस्थितीचा आढावा
या तालुक्यांत आढळले नवे कोरोनाबाधित रुग्ण-
नवीन 187 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 93, अहेरी तालुक्यातील 3, आरमोरी 17, भामरागड तालुक्यातील 5, चामोर्शी तालुक्यातील 29, धानोरा तालुक्यातील 13, एटापल्ली तालुक्यातील 2, कोरची तालुक्यातील 1, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 14, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 1 जण आहे. तर सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 3 तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 3 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 61 रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील 36, अहेरी 11, आरमोरी 1, आरमोरी 4,भामरागड 2, चामोर्शी 3, धानोरा 6, एटापल्ली 3, कुरखेडा 02 तसेच वडसा 4 येथील जणांचा समावेश आहे.