ETV Bharat / state

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली आणखी दोघांची हत्या; कमलापूर हत्ती कॅम्पचीही केली तोडफोड

नक्षलवाद्यांनी आज (सोमवारी) पुन्हा २ जणांची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. मासु पुंघाटी (पोलीस पाटील) आणि ऋषी मेश्राम असे मृतांचे नाव आहे.

author img

By

Published : Dec 2, 2019, 10:14 AM IST

Updated : Dec 2, 2019, 2:04 PM IST

naxalite killed 2 people in gadchiroli
गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केली आणखी दोघांची हत्या

गडचिरोली - आज (सोमवार) पासून नक्षलवाद्यांचा शहीद सप्ताह सुरू झाला आहे. पहिल्याच दिवशी नक्षलवाद्यांनी पुरसलगोंदी येथील पोलीस पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची हत्या केली. तर दुसरीकडे कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्येही साहित्याची आणि शेडची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. मासु पुंघाटी (गाव पाटील) व ऋषी मेश्राम (राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते) अशी मृतांची नावे आहेत.

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड लोह प्रकल्पाला नक्षलवाद्यांचा कायम विरोध राहिला. मात्र, त्यानंतरही शासन आणि प्रशासनाने येथे उत्खननाचे काम सुरू केले. उत्खननाला पुरसलगोंदी येथील पोलीस पाटील मासू पुंगाटी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते ऋषी मेश्राम यांनी समर्थन दर्शविले होते. त्यामुळेच त्यांची हत्या करण्याची करण्यात आल्याची बाब समोर येत आहे.

हेही वाचा - हैदराबाद बलात्कार,खून प्रकरण; पीडितेचे नाव बदलून केले 'जस्टिस फॉर दिशा'

२ डिसेंबरपासून नक्षलवाद्यांचा पीएलजी सप्ताह सुरु झाला आहे. हा सप्ताह पाळण्यासाठी नक्षलवाद्यांनी गेल्या दोन-तीन दिवसापासून विविध ठिकाणी पत्रक, बॅनर बांधून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दहशतीला न जुमानता अनेक गावातील आदिवासी नागरिकांनी एकत्र येत नक्षली बॅनर, पत्रकांची होळी करून 'नक्षलवादी मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर 29 नोव्हेंबरला कोरची तालुक्यातील भिमनखोजी येथील मनोज दयाराम हिडको या १७ वर्षीय युवकाची नक्षलवाद्यांनी गळा चिरून हत्या केली होती.

हेही वाचा - आंध्र प्रदेशात छेड काढणाऱ्या तरुणाची तरुणीकडून चप्पलने धुलाई

त्यानंतर 30 नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील छत्तीसगड सीमेलगतच्या अबुजमाड जंगल परिसरात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक उडाली. चकमकीत 2 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आले. घटनास्थळावरून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात नक्षली साहित्य जप्त केले होते. मात्र, आज(सोमवारी) सप्ताहाचा दिवस उजाडताच नक्षलवाद्यांनी पूरसलगोंदि येथील दोघांची हत्या तसेच कमलापूर येथील हत्ती कॅम्पमधील विविध साहित्य व शेडची मोठ्या प्रमाणात नासधूस केली. तर झाडे रस्त्यावर टाकून भामरागड-आलापल्ली मार्गही बंद केला आहे.

गडचिरोली बिग ब्रेकींग

#नक्षलवाद्यांकडून आणखी दोघांची हत्या
#एटापल्ली तालुक्यातील पुरसलगोंदी येथील घटना
मासु पुंघाटी (पोलीस पाटील) व ऋषी मेश्राम असे मृतकाचे नाव
# कमलापूर येथील हत्ती कॉम्पॅमध्येही नक्षलवाद्यांकडून तोडफोड
# नक्षल सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कृत्य
Last Updated : Dec 2, 2019, 2:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.