ETV Bharat / state

'सृजनक्काने आमचे ऐकले असते तर आज ती जिवंत असती'; नातेवाईकांनी व्यक्त केली खंत

कसनसूर दलमची डीव्हीसी असलेली सृजनक्का ही चकमकीत मारली गेली आहे. नक्षलवाद्यांनी हीच ती वेळ ओळखून स्वतःच्या व कुटुंबाच्या विकासासाठी आत्मसमर्पण करावे व विकासाच्या मूळ प्रवाहात येऊन सुखी जीवन जगावे असे, आवाहन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केले आहे.

author img

By

Published : May 7, 2020, 5:28 PM IST

गडचिरोली - 'आमचा हसता- खेळता परिवार नक्षलवाद्यांमुळे उद्धवस्त झाला'. नक्षलवाद्यांमध्ये सहभागी झालेल्या सृजनक्काला अनेकदा पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित केले. मात्र, तीने आमचे ऐकले नाही. सृजनक्काने आमचे ऐकले असते तर आज ती जिवंत असती, अशी खंत चार दिवसांपूर्वी चकमकीत ठार झालेली महिला नक्षली सृजनक्काच्या नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.

'सृजनक्काने आमचे ऐकले असते तर आज ती जिवंत असती'; नातेवाईकांनी व्यक्त केली खंत

'मी, सृजनक्का सर्व भावंडे गुण्या-गोविंदाने राहत होतो. तेव्हा नक्षली गावात येऊन जेवण बनवून आणण्यासाठी आमच्यावर दबाव आणत असत. सृजनक्का त्यांना जेवण द्यायला जात असे आणि एक दिवस तिला भुलथापा देवून कायमचे सोबत घेऊन गेले. यामुळे आमचा सुखी परिवार दुः खाच्या खाईत लोटला गेला. तिला मी, तसेच वडील चैतू अर्का आत्मसमर्पण करण्यासाठी नेहमीच आग्रह करत होतो. पण तिने दुर्लक्ष केले. तिने आमचे ऐकले असते तर कदाचित ती आज सुखी समाधानाचे जीवन जगत असती, अशी खंत सृजनक्काची बहीण पोटरी डोल पल्लो हिने बोलून दाखवली. नक्षलवाद्यांंच्या भुलथापांना बळी पडून जे आदिवासी तरुण- तरुणी नक्षलींसोबत गेले आहेत. त्यांनी आत्मसमर्पण करावे असे आवाहनही तिने यावेळी केले.

नक्षली सृजनक्काचा भाऊ पेका अर्का याने सांगितले की, नक्षली हे आपल्या स्वत: च्या फायद्यासाठी आमच्या अल्पवयीन मुलांचाही वापर करून घेण्यासाठी मागे पुढे पाहत नाहीत. यामुळेच माझ्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व नक्षलवाद्यांच्या नजरेपासून लांब ठेवण्यासाठी मुलांना इतरत्र शिक्षणासाठी पाठविले आहे. नक्षलवाद्यांनी आमच्या आदिवासी बांधवांचा स्वतःच्या फायद्यासाठी उपयोग करून घेत आदिवासी बांधवांना विकासापासून कोसो दूर ठेवले आहे. नक्षलवाद्यांनी जल, जंगल, जमिनीच्या नावाखाली आदिवासी बांधवांच्या भोळे-भाबडेपणाचा फायदा घेत त्यांच्या स्वत:च्या फायद्यासाठी आजपर्यंत उपयोग करून घेतला आहे. जिल्ह्यातील ५३३ निरपराध आदिवासींचा खून नक्षलवाद्यांनी केला आहे, असे तो म्हणाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.