ETV Bharat / state

गडचिरोली पोलिसांसमोर जहाल नक्षलवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण

गडचिरोली पोलिसांसमोर आज नक्षलवादी दाम्पत्याने आत्मसमर्पण केले. या दाम्पत्याच्या नावावर सरकारने १८ लाख ५०  हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

नक्षलवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण
author img

By

Published : Apr 25, 2019, 9:09 PM IST

गडचिरोली - नक्षल चळवळीत काम करताना होणारा त्रास आणि पिळवणुकीला कंटाळून एका नक्षल दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दीपक ऊर्फ मंगरू सुकरू बोगामी (३०) आणि मोती ऊर्फ राधा झुरु मज्जी (२८) अशी त्यांची नावे आहेत.

दीपक हा जून २००१ मध्ये जागरगुंडा (छत्तीसगड) दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाला होता. जून २०१२ पासून ते आजपर्यंत तो माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक ५ मध्ये डी.व्ही.सी पदावर कार्यरत होता. त्याच्यावर १७ चकमकीचे, १२ खुनाचे, ०३ भूसुरुंग स्फोट घडवून आणल्याचे गुन्हे दाखल असून महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर एकुण ९ लाख २५ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.

नक्षलवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण

राधा मार्च २००४ मध्ये भामरागड (गडचिरोली) दलममध्ये सदस्य म्हणून भरती झाली होती. डिसेंबर २०१७ मध्ये ती उत्तर बस्तर कंपनी क्रमांक १० मध्ये डी.व्ही.सी या पदावर कार्यरत होती. तिच्यावर १५ चकमकीचे आणि २ खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर महाराष्ट्र शासनाने ९ लाख २० हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते. या दोघा पती-पत्नीवर ३२ चकमकी, १४ खून, ३ भूसुरुंग स्फोट असे गुन्हे दाखल असल्याने शासनाने त्यांच्यावर १८ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.

आत्मसमर्पित नक्षलवाद्यांनी दलममधील नक्षलवादी हे अल्पवयीन आदिवासी मुलींना पळवून नेऊन बळजबरीने त्यांना दलममध्ये भरती करत होते, असे कबुल केले. नक्षलवादी नेहमीच स्वत:च्या फायद्यासाठी जाणून बुजून दुर्गम आणि अति दुर्गम भागाच्या विकास कामात आडकाठी निर्माण करतात. या बाबींना कंटाळून आम्ही विकासाच्या मूळ प्रवाहात येण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती त्यांनी दिली.

राज्य शासनाने आत्मसमर्पण योजना घोषित केल्यानंतर २००५ पासून आजपर्यंत गडचिरोली पोलिसांसमोर ६१२ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग उपस्थित होते.

Intro:गडचिरोली पोलिसांसमोर जहाल माओवादी दाम्पत्याचे आत्मसमर्पण

गडचिरोली : नक्षल चळवळीत काम करताना होणारा त्रास व पिळवणुकीला कंटाळून एका नक्षल दाम्पत्याने गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दीपक ऊर्फ मंगरू सुकरू बोगामी (30) व मोती ऊर्फ राधा झुरु मज्जी (28) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांवर 32 चकमकी, 14 खून, 3 भूसुरुंग स्फोट असे गुन्हे दाखल असल्याने शासनाने दोघांवर 18 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस ठेवले होते.Body:दिपक उर्फ मंगरु सुकलु बोगामी हा ३० वर्ष वयाचा माओवादी असुन तो जून २००१ मध्ये जागरगुंडा (छत्तीसगड) दलम मध्ये सदस्य म्हणून भरती होवुन जुन २०१२ पासुन ते आजपावेतो तो माओवाद्यांच्या कंपनी क्रमांक 5 मध्ये डी.व्ही.सी पदावर कार्यरत होता. त्याचेवर १७ चकमकीचे,१२ खुनाचे, ०३ भूसुरुंग स्फोट घडवून आणल्या सबंधाने गुन्हे दाखल असुन महाराष्ट्र शासनाने त्याचेवर एकुण ०९ लाख २५ हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

मोती उर्फ राधा झुरु मज्जी ही २८ वर्ष वयाची माओवादी असुन ती मार्च २००४ मध्ये भामरागड (गडचिरोली) दलम मध्ये सदस्य म्हणुन भरती होवुन डिसेंबर २०१७ मध्ये उत्तर बस्तर कंपनी क्रमांक १० मध्ये डी.व्ही.सी या पदावर
कार्यरत होती. तिच्यावर १५ चकमकीचे व २ खुनाचे गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर महाराष्ट्र शासनाने ९ लाख २०
हजार रूपयाचे बक्षीस जाहीर केले होते.

आत्मसमर्पित माओवादी हे पती-पत्नी असुन दलम मध्ये काम करतांना महिलांवर होत असलेले अत्याचार तसेच दलम मधील माओवादी हे अल्पवयीन आदिवासी मुलींना पळवुन नेतुन बळजबरीने त्यांना दलमध्ये भरती करत होते असे कबुल केले. आदिवासींवर होणारे अनन्वयीत अत्याचार व माओवादी नेहमीच स्वत:च्या फायद्यासाठी जाणुन बुजून दुर्गम व अति दुर्गम भागाच्या विकास कामात आडकाठी निर्माण करतात. या सर्व बाबींना कंटाळून
नक्षलवादयांच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेत विकासाच्या मुळ प्रवाहात येण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

राज्य शासनाने आत्मसमर्पण योजना घोषित केल्यानंतर 2005 पासून आजपर्यंत गडचिरोली पोलिसांसमोर 612 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलिस अधीक्षक मोहित कुमार गर्ग उपस्थित होते.
Conclusion:सोबत व्हिज्युअल व sp यांचा बाईट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.