ETV Bharat / state

गडचिरोलीत इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे आंदोलन - News of the NCP movement

इंधन दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने शनिवारी राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांच्या नेतृत्वात मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे गडचिरोलीत आंदोलन

author img

By

Published : Jul 3, 2021, 8:58 PM IST

गडचिरोली - गॅस, पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शनिवारी राज्यव्यापी जन आक्रोश आंदोलन पुकारण्यात आले होते. गडचिरोलीच्या इंदिरा गांधी चौकातही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांच्या नेतृत्वात मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शाहीन हकीम यांच्या नेतृत्वात महिला पदाधिकाऱ्यांनी चूल पेटवून भाकरी थापल्या. तसेच, गॅस व दुचाकी वाहनांना फुलांचा हार चढवून केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवला.

गडचिरोलीमध्ये इंदिरा गांधी चौकात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले, यावेळी बोलताना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम

'जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ कमी करा'

मोदी सरकारने तत्काळ गॅस व इंधन दरवाढ कमी करावी, अन्यथा, यापेक्षा तिव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी यावेळी दिला. केंद्र सरकार जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ करून सामान्य नागरिकांची गळचेपी करीत आहे. गॅस, इंधन दरवाढीमुळे घरगुती अर्थसंकल्प कोलमडत आहे. महागाईच्या विरोधात पुढे महिला उग्र रूप धारण केले, तर देशाची व राज्याची परिस्थिती बिघडून जाईल. त्यामुळे केंद्र सरकारने संतापाचा अंत पाहण्यापेक्षा तात्काळ दखल घेऊन गॅस, इंधन, पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ कमी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम यांनी यावेळी केली.

कार्यकर्त्यांची जारदार घोषणाबाजी

या आंदोलनात जिल्हाभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष योगेश नांदगाये, मुख्य सचिव संजय कोचे, प्रेमीलाताई रामटेके, मनीषाताई खेवले, सारिका गडपल्लीवार, ममता पटवर्धन, सरचिटणीस जगण जांभुळकर, सेवादल जिल्हाध्यक्ष प्रभाकर बारापात्रे, विठ्ठल निखुले, विनायक झरकर, मुस्ताक शेख, विवेक बाबनवाडे, विजय धकाते, गोकुलदास ठाकरे, कपील बागडे, इंद्रपाल गेडाम आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.शाहीन हकीम जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.