ETV Bharat / state

Kamalapur Elephant Camp : कमलापूर हत्तीकॅम्प हलविण्याचा केंद्र सरकारला काय अधिकार ? - आमदार धर्मराव बाबा आत्राम - हत्तीकॅम्प कमलापूर

सिरोंचा वनविभागातील कमलापूर वन परिक्षेत्रातील हत्ती कॅम्प ( Kamalapur Elephant Camp ) हे अहेरी विधानसभा क्षेत्रात येत असून जिल्ह्यातीलच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन क्षेत्र आहे. याठिकाणी आवश्यक निधी देऊन पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करत आहोत. त्याअनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाघांची चर्चा सुरू असताना मी स्वतः कमलापूर येथील हत्तीकॅम्प येथून का हलविणार आहे ?, असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा हत्तीकॅम्पमधून हत्तींना हलविले जाणार नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले, असे आमदार धर्मराव बाबा आत्राम म्हणाले.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jan 24, 2022, 8:07 PM IST

गडचिरोली - अहेरी तालुक्यातील कमलापूर हत्तीकॅम्प मधील ( Kamalapur Elephant Camp ) हत्तींना गुजरात राज्यातील प्राणी संग्रहालयात हलविण्याचा प्रयत्न सुरू असताना अहेरी विधानसभेचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी कमलापूर येथील हत्तीकॅम्पला प्रत्यक्ष भेट ( MLA Dharmarao Baba Atram Visited Kamalapur Elephant Camp ) दिली. त्यांनी येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत चर्चा करून पाहणी केली. यावेळी आमदार आत्राम यांनी हत्तीकॅम्प राज्य सरकारची मालमत्ता असून केंद्र सरकारचा अधिकार काय ,? असा प्रश्न उपस्थित केला.

हत्तींना हलविले जाणार नाही - सिरोंचा वनविभागातील कमलापूर वन परिक्षेत्रातील हत्तीकॅम्प हे अहेरी विधानसभा क्षेत्रात येत असून जिल्ह्यातीलच नव्हेतर संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव पर्यटन क्षेत्र आहे. याठिकाणी आवश्यक निधी देऊन पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करत आहोत. त्याअनुषंगाने जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाघांची चर्चा सुरू असताना मी स्वतः कमलापूर येथील हत्तीकॅम्प येथून का हलविणार आहे ?, असा प्रश्न उपस्थित केला. तेव्हा हत्तीकॅम्पमधून हत्तींना हलविले जाणार नसल्याचे वन विभागाने स्पष्ट केले, असे आमदार आत्राम म्हणाले.

पर्यटन क्षेत्र विकसित झाल्यास स्थानिकांना रोजगार - सध्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांच्याकडेच वन खाते असून त्यांना आणि पर्यटन क्षेत्र वाढविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनाही निवेदन दिले आहे. याठिकाणी पर्यटन क्षेत्र विकसित झाल्यास स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी राज्यसरकार सकारात्मक असून हत्ती या ठिकाणाहून हलविले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.