ETV Bharat / state

आरक्षण हा खुळखुळा असून शक्ती खर्च घालू नका! नक्षलवाद्यांचा मराठा समाजाला पत्रकातून सल्ला - मराठा आरक्षणाची बातमी

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता नक्षलवाद्यांनी उडी घेतली आहे. याबाबत नक्षलवाद्यांनी प्रथमच भूमिका उघड केली असून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)च्या महाराष्ट्र राज्य कमिटीचा सचिव सह्याद्री याच्या सहीने पत्रक जारी केले. आरक्षण हा खुळखुळा असून त्यात शक्ती खर्च घालू नका, असा सल्लाही पत्रकातून दिला आहे.

नक्षलवाद्यांचा मराठा समाजाला पत्रकातून सल्ला

author img

By

Published : Jun 12, 2021, 4:39 PM IST

गडचिरोली - मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आता नक्षलवाद्यांनी उडी घेतली आहे. याबाबत नक्षलवाद्यांनी प्रथमच भूमिका उघड केली असून भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी)च्या महाराष्ट्र राज्य कमिटीचा सचिव सह्याद्री याच्या सहीने पत्रक जारी केले. आरक्षण हा खुळखुळा असून त्यात शक्ती खर्च घालू नका, असा सल्लाही पत्रकातून दिला आहे.

'मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा'

मराठा समाजातील दलाल नेत्यांपासून सावध राहा. ते संघटित शक्तीला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरत असल्याचा दावाही केला असून मराठ्यांना आरक्षणासाठी लढावे लागणे म्हणजे देशावरील कृषी संकटाचा भाग असल्याचे मत व्यक्त केले आहे. आरक्षण कोणत्याही समाजाला न्याय-समानता देऊ शकले नाही, याचा उल्लेख करत मागासलेल्या समाजाला पुढे आणण्यासाठी आरक्षणाचे समर्थन, मात्र अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेची नियत योग्य नसल्याचे मतही व्यक्त केले आहे.

पत्रकामुळे खळबळ!

राज्यावर बहुतांश मराठा समाजाचे मुख्यमंत्री बसले असले तरी तेच मराठ्यांच्या अधोगतीला जबाबदार आहेत. आरक्षण मिळाले त्यांना नोकऱ्या मिळाल्या का? असा सवाल पत्रकात विचारला असून, हा प्रश्न निर्माण करणारे तुमच्यात वावरत-मिरवत असल्याचा दावाही केला आहे. व्यवस्था सडलेली असल्याने मराठा समाजाने आता नक्षल चळवळीला पाठिंबा देत यातून परिवर्तन घडविण्याचे आवाहन पत्रकातून केले आहे. या पत्रकामुळे खळबळ उडाली असून या पत्रकाला मराठा समाज कितपत महत्त्व देतो, हे बघावे लागणार आहे.

नक्षलवाद्यांचा मराठा समाजाला पत्रकातून सल्ला
नक्षलवाद्यांचा मराठा समाजाला पत्रकातून सल्ला

हेही वाचा - अखिल भारतीय सांख्यिकी स्पर्धा : सोलापुरचा प्रशांत ननवरे देशात दुसरा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.