ETV Bharat / state

मुक्तीपथ अभियानातून मार्कंडादेव यात्रा झाली खर्रा व तंबाखूमुक्त

यात्रेत येताना भाविक खर्रा, तंबाखूचे सेवन करून तर कुणी मद्यप्राशन करून यायचे. त्यामुळे यात्रेत भांडणे, अस्वच्छता असे प्रकार तर दिसायचेच पण यात्रेचे पावित्र्यही धोक्यात यायचे. हा प्रकार थांबवून यात्रा खर्रा व तंबाखूमुक्त करण्यासाठी २०१७ पासून मुक्तिपथने जनजागृती अभियान सुरू केले.

gadchiroli, muktipath janjagruti
मार्कंडादेव यात्रा
author img

By

Published : Feb 27, 2020, 7:44 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीच्या पर्वानिमित्त दहा दिवस यात्रा भरते. गेल्या तीन वर्षांपासून ही यात्रा दारू, खर्रा आणि तंबाखूमुक्त झाली आहे. या उपक्रमामागे ग्रामपंचायत, मंदिर देवस्थान समिती, मुक्तिपथ अभियान आणि पोलीस प्रशासनाचे योगदान असून व्यसनमुक्त यात्रेचे हे चौथे वर्ष आहे.

मार्कंडादेव यात्रेचे दृश्य

मार्कंडादेव यात्रेत विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. पूर्वी यात्रेत येताना भाविक खर्रा, तंबाखूचे सेवन करून तर कुणी मद्यप्राशन करून यायचे. त्यामुळे, यात्रेत भांडणे, अस्वच्छता असे प्रकार तर दिसायचेच पण यात्रेचे पावित्र्यही धोक्यात यायचे. हा प्रकार थांबवून यात्रा खर्रा व तंबाखूमुक्त करण्यासाठी २०१७ पासून मुक्तिपथने जनजागृती अभियान सुरू केले. याला मार्कंडादेव येथील ग्रामस्थ, ग्रामपंचायत, मंदिर समिती व पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळाले. त्यामुळे, मार्कंडादेव यात्रा सलग तीन वर्षे खर्रा व तंबाखूमुक्त राहिली.

या वर्षीही ही यात्रा व्यसनमुक्त करण्यासाठी मुक्तिपथ अंतर्गत व्यापक जनजागृती करण्यात आली. येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी मुक्तिपथच्या सहकार्याने येणार्‍या भक्तांना दर्शनाला जाताना खर्रा व तंबाखू घेऊन न जाण्याचे आवाहन केले. चोरून लपून खर्राविक्री करणार्‍यांवर पोलिसांनी छापे टाकून कारवाई केली. तंबाखूजन्य पदार्थांची अंत्ययात्रा काढून त्याचे दहन करण्यात आले. त्यामुळे व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प अनेकांनी या यात्रेदरम्यान केला.

हेही वाचा- अतिदुर्गम आदिवासी गाव.. वीज-वाहतुकीची पुरेशी सोय नाही; तरीही कोमल बनली माडिया समाजातील पहिली महिला डॉक्टर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.