ETV Bharat / state

दक्षिण गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; अनेक वाहतूक मार्ग बंद - दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती

मुसळधार पावसामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गडचिरोली भागातील आलापल्ली- भामरागड, आलापल्ली- सिरोंचा, रेपनपल्ली- कमलापूर, अहेरी- गडअहेरी हे मार्ग सद्या पुरामुळे बंद आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

दक्षिण गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; अनेक वाहतूक मार्ग बंद
author img

By

Published : Aug 23, 2019, 9:51 PM IST

गडचिरोली - गुरूवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अहेरी, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यांचा यात समावेश आहे.

दक्षिण गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा तडाखा; अनेक वाहतूक मार्ग बंद
दक्षिण गडचिरोली भागातील आलापल्ली- भामरागड, आलापल्ली- सिरोंचा, रेपनपल्ली- कमलापूर, अहेरी- गडअहेरी हे मार्ग सद्या पुरामुळे बंद आहेत. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासात सर्वात जास्त पाऊस अहेरी तालुक्यात (98.4 मिमी) झाला.मुसळधार पावसाने मुलचेरा तालुक्यातील गोमणी गावालगत असलेल्या नाल्यांना आणि कोपरअली नदीला पूर आला आहे. आलापल्ली-मुलचेरा-आष्टी मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. तालुक्यात असलेली दिना नदीही तुडुंब भरून वाहत असून नदीच्या पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर गोमणी गावात सुद्धा पाणी शिरण्याची शक्यता आहे.

Intro:दक्षिण गडचिरोली जिल्ह्याला पुन्हा पावसाचा तडाखा : अनेक मार्ग बंद; जनजीवन विस्कळीत

गडचिरोली : कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊसामुळे दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी, भामरागड, मुलचेरा, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. दक्षिण गडचिरोली भागातील आलापल्ली- भामरागड, आलापल्ली- सिरोंचा, रेपनपल्ली- कमलापूर, अहेरी- गडअहेरी हे मार्ग सद्या पुरामुळे बंद असून अनेक वाहने अडकून पडले आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या 24 तासात सर्वात जास्त अहेरी तालुक्यात 98.4 मिलिमीटर इतका पाऊस झाला.Body:मुसळधार पावसाने मुलचेरा तालुक्यातील गोमणी गावालगत असलेल्या नाल्याला व आंबटपल्ली नाल्याला आणि कोपरअली नदीला पूर आल्याने आलापल्ली-मुलचेरा-आष्टी मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. या परिसरातील नदी-नाले तुडुंब भरलेले असून पूर परिस्थिती
निर्माण झाली आहे. तालुक्यात असलेली दिना नदीही तुडुंब भरून वाहत असून नदीवरील पुलावरून तीन ते चार फूट पाणी वाहत आहे. अहेरी उपविभागात मुसळधार पावसाने कहर केल्यामुळे या परिसरातील नदी-नाले तुडुंब भरत वाहत असून पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. पावसाचा कहर असाच सुरू राहिल्यास गोमणी गावात सुद्धा पाणी शिरण्याची शक्यता आहे. सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुलचेरा तालुक्यातील गोमणी, आंबटपल्ली आणि कोपरअली नदीवरील पुलावर पाणी वाहत असल्याने मुलचेरा तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.