गडचिरोली - जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कठाणी, वैनगंगा, दिना, पोटफोडी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे गडचिरोली-हैदराबाद या प्रमुख मार्गासह 10 मार्ग बंद झाले आहेत. यात गडचिरोली-नागपूर या मार्गाचाही समावेश आहे.
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; गडचिरोली-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासह प्रमुख 10 मार्ग बंद
गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील कठाणी, वैनगंगा, दिना, पोटफोडी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे गडचिरोली-हैदराबाद या प्रमुख मार्गासह 10 मार्ग बंद झाले आहेत.
गडचिरोली-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासह प्रमूख 10 मार्ग बंद
गडचिरोली - जिल्ह्यात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्याच्या उत्तर भागातील तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कठाणी, वैनगंगा, दिना, पोटफोडी या नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे गडचिरोली-हैदराबाद या प्रमुख मार्गासह 10 मार्ग बंद झाले आहेत. यात गडचिरोली-नागपूर या मार्गाचाही समावेश आहे.
Intro:गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस ; गडचिरोली-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गासह प्रमूख 10 मार्ग बंद
गडचिरोली : जिल्ह्यात गेल्या 24 तासापासून पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यातील उत्तर भागातील तालुक्यांमध्ये प्रचंड पाऊस पडत असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात असलेल्या कठाणी -वैनगंगा- दिना, पोटफोडी आदी सर्व नद्यांनी पात्र सोडल्याने गडचिरोली-हैदराबाद या प्रमुख मार्गासह 10 मार्ग बंद झाले आहेत. यात गडचिरोली -नागपूर या प्रमुख मार्गांचाही समावेश आहे. Body:धानोरा तालुक्यातील डॉक्टर बंग दांपत्याच्या सर्च -शोधग्राम प्रकल्पालाही पुराच्या पाण्याने वेढले आहे. या भागात मुसळधार पाऊस पडत असून आसपासच्या गावातील शेततळे व नाले भरून वाहत असल्याने या भागात हे पाणी वेगाने शिरले आहे. दरम्यान धानोरा शहराला जोडणाऱ्या मुख्य महामार्गावर देखील पाणी असल्याने इथली वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. सर्च -शोधग्राम प्रकल्पातील काही इमारतींमध्ये देखील पाणी शिरले असून सध्या कुठल्याही हानीची वार्ता नसली तरी शोधग्राम प्रकल्पाला पुराचा वेढा कायम असल्याने व्यवस्थापन योग्य ती खबरदारी घेत आहे. याच भागात आदिवासींसाठी असलेले मा दंतेश्वरी रुग्णालय देखील आहे. ज्यात जिल्हाभरातून आलेल्या आदिवासी रुग्णांवर उपचार केले जातात. दरम्यान या भागावर जिल्हा प्रशासनाने देखील नजर ठेवली असून डॉक्टर बंग यांच्याशी जिल्हा प्रशासनाने संपर्क साधला आहे.Conclusion:सोबत wkt pkg आहे