ETV Bharat / state

gadchiroli rain update गडचिरोलीत पावसामुळे हाहाकार, 100 गावांचा संपर्क तुटला

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 86.6 मिमी पावसाची नोंद झाली असून त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी तालुक्यातील सुमारे 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे.

gadchiroli rain update
गडचिरोलीत पावसामुळे हाहाकार, 100 गावांचा संपर्क तुटला
author img

By

Published : Sep 12, 2022, 11:02 PM IST

गडचिरोली गडचिरोली जिल्ह्यात गेल्या 24 तासात 86.6 मिमी पावसाची नोंद झाली असून त्यामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, एटापल्ली, सिरोंचा व अहेरी तालुक्यातील सुमारे 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. गडचिरोली सीमेलगत छत्तीसगड राज्यातील जगदलपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडल्याने गडचिरोली जिल्ह्यातील भामरागडजवळून वाहणारी इंद्रावती नदी दुथडी भरुन वाहत आहे.

भामरागड नजीकच्या पर्लकोटा नदीच्या पुलावरुन पाणी वाहू लागल्याने आलापल्ली-भामरागड रस्ताही बंद झाला आहे. त्यामुळे भामरागड शहर बाजारपेठ धोकाच्या पातळीवर आहे. तर, आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुमरगुडा नाल्याला पूर आल्याने यावर्षी आठ वेळा तर पर्लकोटा नदीच्या पुरामुळे सहाव्या वेळी भामरागड तालुक्याचा 70 ते 80 आदिवासी खेड्यांचा संपर्क तुटला आहे.

दक्षिणेकडच्या सिरोंचा तालुक्यातुन छत्तीसगड, तेलंगणा व महाराष्ट्र जोडणारा राष्ट्रीय महामार्ग चेन्नुर जवळ बतकम्मा नाल्या जवळ रस्ता वाहुन गेली होता. त्यामुळे काल दिवसभर वाहतूक ठप्प झाली होती. जिल्ह्यात सुरु असलेल्या पाऊसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज काहीभागत पाऊस विश्रांती दिल्याने जनजीवन पुर्वपदावर येण्याची शक्यता आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.