ETV Bharat / state

गडचिरोलीत दिव्यांग खेळाडूंच्या डब्यात मद्यपी रेल्वे कर्मचार्‍यांचा धुडगूस

author img

By

Published : Aug 19, 2019, 11:38 PM IST

व्हॉलीबॉल स्पर्धा खेळून रेल्वेने परत येणाऱ्या चंद्रपूर येथील दिव्यांग खेळाडूंसोबत रेल्वेच्या चार मद्यपी कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली आहे. त्यानंतर त्यांना बळजबरीने रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले.

खेळाडूंची रात्रभर चौकशी

गडचिरोली - व्हॉलीबॉल स्पर्धा खेळून रेल्वेने परत येणाऱ्या चंद्रपूर येथील दिव्यांग खेळाडूंसोबत रेल्वेच्या चार मद्यपी कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली आहे. त्यानंतर त्यांना बळजबरीने रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. तर देसाईगंज (वडसा) येथील रेल्वे पोलिसांनीही खेळाडूंसोबत अमानवीय कृत्य करत आरोपींसारखी रात्रभर चौकशी केली. रविवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्याचे 10 दिव्यांग खेळाडू व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी गोंदिया जिल्ह्यात गेले होते. स्पर्धा संपल्यानंतर सर्व खेळाडू गोंदिया-बल्लारपूर रेल्वेमार्गावरील मोरगाव-अर्जुनी स्थानकावरुन रेल्वेत दिव्यांगांच्या डब्यात बसले होते. मात्र, याच डब्यात मद्यपी अवस्थेत चार रेल्वे कर्मचारी बसले. त्यांनी खेळाडूंसोबत बाचाबाची करुन खेळाडूंनाच देसाईगंज येथील रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. आम्हाला मारहाण केली, असाही आरोप मद्यपी कर्मचाऱ्यांनी खेळाडूंवर केला आहे. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी खेळाडूंना रात्रभर चौकीमध्ये ठेवून त्यांची चौकशी केली. सकाळी खेळाडूंना सोडून देण्यात आले. या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्या चारही मद्यपी कर्मचाऱ्यांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Intro:दिव्यांग खेळाडूंच्या डब्यात मद्यपी रेल्वे कर्मचार्‍यांचा धुडगूस ; तरीही खेळाडूंची रात्रभर चौकशी

गडचिरोली : व्हॉलीबॉल स्पर्धा आटोपून रेल्वेने येणाऱ्या दिव्यांग खेळाडूंसोबत रेल्वेच्या चार मद्यपी कर्मचाऱ्यांनी बाचाबाची करून बळजबरीने रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. तर देसाईगंज (वडसा) येथील रेल्वे पोलिसांनीही खेळाडूंसोबत अमानवीय कृत्य करत आरोपींसारखी रात्रभर चौकशी केली. रविवारी रात्री घडलेल्या या प्रकारामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.Body:चंद्रपूर जिल्ह्याचे 10 दिव्यांग खेळाडू व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी गोंदिया जिल्ह्यात गेले होते. स्पर्धा आटोपल्यानंतर सर्व खेळाडू गोंदिया-बल्लारपूर रेल्वेमार्गावरील मोरगाव-अर्जुनी स्थानकावरुन रेल्वेत दिव्यांगांच्या डब्यात बसले होते. मात्र याच डब्यात मद्यपी अवस्थेत चार रेल्वे कर्मचारी बसले. त्यांनी खेळाडूंसोबत बाचाबाची करून खेळाडूंनाच देसाईगंज येथील रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन केले. आम्हाला मारहाण केली, असाही आरोप मद्यपी कर्मचाऱ्यांनी खेळाडूंवर लावला. त्यामुळे रेल्वे पोलिसांनी खेळाडूंना रात्रभर चौकीमध्ये ठेवून त्यांची चौकशी केली. सकाळी खेळाडूंना सोडून देण्यात आले. या प्रकारामुळे रेल्वे प्रशासनाप्रति तीव्र संताप व्यक्त केला जात असून त्या चारही मद्यपी कर्मचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
Conclusion:सोबत फोटो आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.