ETV Bharat / state

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण भोवले ; उपसरपंचाचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द - deputy sarpanch membership canceled

गडचिरोलीतील गुरनोली गावातील उपसरपंच राजन खुणे यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणे चांगलेच भोवले आहे. खुणे यांनी गुरनोली येथील वनविभागाच्या शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते.

Rajan Khune Guarnoli Village Gadchiroli
शासकीय जमिनीवरील अतिक्रमणामुळे उपसरपंचाचे सदस्यत्व रद्द
author img

By

Published : Jan 11, 2020, 11:36 PM IST

गडचिरोली - कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील उपसरपंच राजन खुणे यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणे चांगलेच भोवले आहे. खुणे यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर वन विभागाच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण केले. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द केले.

हेही वाचा... 'तीन पक्षांच्या नेत्यांचे फोटो एकत्र पाहून आश्चर्य वाटत असेल, पण भाजपला घालवण्यासाठी हे आवश्यक होते'

गुरनोली येथील वनविभागाच्या शासकीय जागेवर निस्तार पत्रकातील नोंदीनुसार राखीव असलेल्या जमिनीवर उपसरपंच राजन खुणे यांनी अतिक्रमण केले होते. याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य गणेश तुलावी व अन्य ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या ठरावासह आणि ठोस पुराव्यानिशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. याच तक्रारीच्या अनुषंगाने, मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कुरखेडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी केला. त्यानुसार उप मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांमार्फत (ग्रा.पं.) जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला होता.

हेही वाचा... 'कोट्यवधीचा निधी खर्च झालाय.. सिंचन घोटाळ्याचे सत्य पुढे आलेच पाहिजे'

चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर हे प्रकरण शासकीय जागेवरील अतिक्रमणाचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे राजन खुणे यांनी शासकीय व सार्वजनिक वापराच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी राजन खुणे यांचे गुरनोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद व सदस्यत्व रद्द केले.

Intro:शासकीय जमिनीवर अतिक्रमण भोवले ; ग्रामपंचायतीचे सदस्यत्व रद्द

गडचिरोली : कुरखेडा तालुक्यातील गुरनोली येथील उपसरपंच राजन खुणे यांना शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणे चांगलेच भोवले. त्यांनी पत्नीच्या नावावर वन विभागाच्या शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे.Body:गुरनोली येथील वनविभागाच्या शासकीय जागेवर निस्तार पत्रकातील नोंदीनुसार शंकरपटकरिता राखीव असलेल्या जमिनीवर उपसरपंच राजन खुणे यांनी अतिक्रमण केल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्य गणेश तुलावी व अन्य ग्रामस्थांनी ग्रामसभेच्या ठरावासह ठोस पुराव्यानिशी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे  केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने, मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कुरखेडा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी चौकशी करुन उप मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांमार्फत (ग्रा.पं.) जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठविला होता. 

चौकशी अहवालानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अर्जदार व गैरअर्जदार यांचा युक्तिवाद ऐकून घेतला. त्यानंतर  हे प्रकरण शासकीय जागेवरील अतिक्रमणाचे असल्याचे स्पष्ट होत असल्याने, तसेच राजन खुणे यांनी शासकीय व सार्वजनिक वापराच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, १९५८ च्या कलम १४ (१) (ज-३) चा भंग केल्याचे  सिद्ध होत असल्याने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी राजन खुणे यांचे गुरनोली ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद व सदस्यत्व रद्द केले.
Conclusion:सोबत पासपोर्ट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.