ETV Bharat / state

धक्कादायक! शासकीय वसतिगृहातील जेवणात अळ्या; विद्यार्थिनींचा आरोप

सिरोंचा येथील शासकीय निवासी वसतीगृहातील विद्यार्थिनींच्या जेवणात चक्क अळया आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचा आहार साहित्य पुरवठा केला जात असल्याने असा प्रकार घडत असल्याचे येथील विद्यार्थिनींचे म्हणणे आहे.

विद्यार्थिनींना दिलं जातंय अळ्या असलेलं जेवण
author img

By

Published : Jul 17, 2019, 9:48 AM IST

गडचिरोली- मुलींच्या शिक्षणासाठी निवासाची सोय करून सरकार कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करते. मात्र, शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासत विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सिरोंचा येथील शासकीय वसतिगृहात समोर आला आहे. येथील विद्यार्थिनींच्या जेवणात चक्क अळ्या आढळून आल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला.

विद्यार्थिनींना दिलं जातंय अळ्या असलेलं जेवण

सिरोंचा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे शासकीय अनुसूचीत जाती (नवबौध्द) मुलींसाठी निवासी वसतिगृह आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय अनु.जाती मुलींच्या 81 निवासी शाळा आहेत. त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यात 2 शाळा आहेत. एक अहेरी-वांगेपल्ली येथे व दुसरी सिरोंचा येथे आहे. सिरोंचा येथील शासकीय शाळेत गेल्या सात दिवसांपासून अळ्या असलेले निकृष्ट जेवन विद्यार्थिनींना दिले जात असल्याचा आरोप विद्यार्थिनींनी केला आहे.

विशेष म्हणजे ही मुलींची शाळा असूनही या ठिकाणी एकाही महिला शिक्षिकेची नियुक्ती करण्यात आलेली नाही. सुरुवातीपासूनच येथील पदे रिक्त असल्याची माहिती मिळत आहे. शाळेत अनेक पदे रिक्त असून महत्वाचे महिला अधिक्षक हे पदही रिक्त आहे. त्यामुळे या मुलींची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे दिसते.

एकीकडे सरकार 'बेटी बचाओ, बेटी पढाओ'चा नार देत असले तरी सत्य परिस्थिती वेगळी आहे. आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे आहाराचे साहित्य पुरवठा केले जात असल्याने, असा प्रकार घडत असल्याचे येथील विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. अनेकदा तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नाही, त्यामुळे तक्रार करायची कुणाकडे? असेही येथील विद्यार्थिनींनी बोलून दाखविले. शासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील विद्यार्थिनींनी दिला आहे.

Intro:शासकीय निवासी वस्तीगृहात विद्यार्थिनींना दिलं जातंय अळ्या असलेलं जेवण

गडचिरोली : शासन विद्यार्थिनीच्या शिक्षणासाठी निवासी सोय करून करोडो रुपयांचा निधी खर्च करीत आहे. मात्र शासनाच्या उद्देशालाच हरताळ फासत विद्यार्थिनींच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार सिरोंचा येथील शासकीय निवासी वस्तीगृहात समोर आला आहे. येथील विद्यार्थिनींच्या जेवणात चक्क अळया आढळून आल्याचा प्रकार मंगळवारी समोर आला.Body:सिरोंचा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे शासकीय अनु.जाती (नवबौध्द) मुलींसाठी निवासी वसतिगृह आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय अनु.जाती (नवबौध्द) मुलींच्या 81 निवासी शाळा आहेत. त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यात 2 दोन शाळा आहेत. एक अहेरी-वांगेपल्ली येथे व दुसरी सिरोंचा येथे. सिरोंचा येथील शासकीय अनु. जाती नवबोद्ध मुलींची शाळा २०१३ ला सुरू करण्यात आली. यात मुलींसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली. यात भोजनही दिलो जातो. पण सात दिवसापासुन अळी असलेले जेवन विद्यार्थिनींना दिले जात आहे.

विशेष म्हणजे ही मुलींची शाळा असून एकही महिला शिक्षिकेची नियुक्ती येथे करण्यात आलेली नाही. सुरूवातीपासूनच येथील पदे रिक्त असल्याची माहिती आहे. शाळेत अनेक पदे रिक्त असून महत्वाचे अधीक्षक महिला पदही रिक्त आहे. त्यामुळे या मुलींची सुरक्षा वार-यावरच असल्याचे दिसते. एकीकडे सरकार 'बेटी बटाओ बेटी बचाओ' नार देत असल तरी सत्य परिस्थिती वेगळी आहे. आहार पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचा आहार साहित्य पुरवठा केला जात असल्याने असा प्रकार घडत असल्याचे येथील विद्यार्थिनींचे म्हणणे आहे. अनेकदा तक्रार करूनही अधिकारी लक्ष देत नाही, त्यामुळे तक्रार करायची कुणाकडे ? असेही येथील विद्यार्थिनींनी बोलून दाखविले. शासनाने या प्रकरणाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा येथील विद्यार्थिनींनी दिला आहे.
Conclusion:सोबत व्हिज्युअल व तीन विद्यार्थिनींचे बाईट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.