गडचिरोली - लॉकडाऊन काळात गुळाचा सडवा टाकून दारू गाळल्या जात असल्याच्या माहितीवरून सिरोंचा तालुक्यातील अमरावती आणि सूर्यरावपल्ली येथे पोलिसांच्या सहकार्याने मुक्तीपथ तालुका चमूने धाड टाकली. या दोन कारवायांमध्ये १६ ड्रम गुळाचा सडवा नष्ट करण्यात आला. जवळपास दीड लाखाचा हा मुद्देमाल असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी पाच जणांवर कारवाई करण्यात आली.
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gad-03-daru-news-7204540_23042020190924_2304f_1587649164_813.jpg)
अमरावती येथे काही जणांनी दारू काढण्यासाठी गुळाचा सडवा टाकल्याची माहिती गाव संघटनेदवारे मुक्तीपथ तालुका चमुला मिळाली. त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने बुधवारी या गावातील संशयित १२ घरांची झडती घेतली. यातील पाच घरी जवळपास ७० हजार रूपयांचा एकूण १२ ड्राम गुळाचा सडवा सापडला. हा सर्व सडवा पोलिसांनी नष्ट केला. ५ विक्रेत्यांवर कारवाईही करण्यात आली.
![](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-gad-03-daru-news-7204540_23042020190924_2304f_1587649164_1110.jpg)