ETV Bharat / state

गडचिरोली : भामरागडात ५८ पेट्या दारू जप्त - Gadchiroli police on liquor

भामरागड पोलीस स्टेशनच्या स्थानिक दारूबंदी पथकाने ४ लाख ७४ रुपयांचा किमतीचे ५८ पेट्या देशी दारू मुद्देमालासह वाहतूक करणारा चार चाकी पिकअप वाहन जप्त केले आहे.

गडचिरोली : भामरागडात ५८ पेट्या दारू जप्त

author img

By

Published : Jun 8, 2021, 10:32 PM IST

गडचिरोलीः जिल्ह्यातील भामरागड पोलीस स्टेशनच्या स्थानिक दारूबंदी पथकाने ४ लाख ७४ रुपयांचा किमतीचे ५८ पेट्या देशी दारू मुद्देमालासह वाहतूक करणारा चार चाकी पिकअप वाहन जप्त केले आहे. ही करवाई पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ सापळा रचून ६ जून रोजी केली. लॉकडाऊन काळातील दारूवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

संशयित वाहनांची तपासणी

गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असतानासुद्धा काही जण अवैधरीत्या छत्तीसगढ राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात दारू आणून चोरट्या मार्गाने भामरगड तालुक्यात विक्री करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. त्याअनुशंगाने पोलिसांनी पाळत ठेवली. 6 जूनला चारचाकी वाहनाने दारू आणत असल्याचे गोपनीय माहिती भामरागड पोलिसांना मिळली. त्या माहितीच्या आधारे भामरागड गावालागत पर्लकोटा नदीच्या पुलाजवळ सापळा रचून संशयित वाहनांची तपासणी केली. यात ५८ पेट्या देशी दारू आढळुन आली. सदर वाहनासह असा एकूण ४ लाख ७४ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी अर्जुन संजय बाला, सुशांत धिरेन शाहा, राधेश्याम शंकर हलदर तिघेही रा. जयरामनगर जि. कांकेर (छत्तीसगड) या तिघांना अटक करण्यात आली आहे.

यांनी केली कारवाई

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवने यांच्या मार्गदर्शनात भामरागडच्या ठाणेदार पोलीस निरीक्षक किरण रास्कर, पोलीस उपनिरीक्षक मंगेश कराडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले, पोलीस उप निरीक्षक संघमित्रा बांबोळे, पो. शि. संदीप गव्हारे, शरद गुरनुले, अतेश मेश्राम, आशिष पाटील, बाळू केकाण, नीलेश कुळधर यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.