ETV Bharat / state

Naxalites Arrested : गडचिरोली पोलीसांकडून दोन नक्षलवाद्यांना अटक ; शासनाकडून जाहीर होते 'इतक्या' रुपयांचे बक्षीस - गडचिरोली पोलीस

गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दोन संशयीत व्यक्ती आढळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता, ते नक्षलवादी असल्याचे समजले त्यावरून ताब्यात घेवून त्यांना सावरगाव ठाण्यात अटक करण्यात (Gadchiroli police arrested two naxalites)आली.

Naxalites arrested by Gadchiroli police
गडचिरोली पोलीसांकडून नक्षलवाद्यांना अटक
author img

By

Published : Oct 9, 2022, 1:01 PM IST

गडचिरोली : जिल्ह्याच्या सावरगाव पोलिस मदत केंद्र परिसरात ०७ ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलीस दलाकडून नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दोन संशयीत व्यक्ती आढळून आले. त्यांची अधिक चौकशी केली असता, ते नक्षलवादी असल्याचे समजले त्यावरून ताब्यात घेवून त्यांना सावरगाव ठाण्यात अटक करण्यात (Gadchiroli police arrested two naxalites)आली. अटक करण्यात आलेल्या नक्षलवाद्यांमध्ये सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे (वय २४ वर्ष) रा. मोरचूल ता. धानोरा व समुराम ऊर्फ सुर्या घसेन नरोटे (वय २२ वर्ष) रा. मोरचूल ता. धानोरा जि. गडचिरोली यांचा समावेश आहे.

सनिरामवर ८ लाखाचे बक्षीस - सनिराम ऊर्फ शंकर ऊर्फ कृष्णा श्यामलाल नरोटे, हा ऑक्टोबर २०१५ मध्ये टिपागड दलममध्ये भरती होवुन, डीव्हीसीएम जोगन्नाचा अंगरक्षक म्हणुन २०१८ पर्यंत कार्यरत होता. त्यानंतर ऑगस्ट २०१८ ते २०२० पर्यंत कंपनी १० मध्ये कार्यरत होता व सन २०२० ते आतापर्यंत पीपीसीएम म्हणुन कंपनी १० मध्ये कार्यरत होता. महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर ८ लक्ष रुपये बक्षीस जाहीर केले (Naxalites Arrested) होते.

गडचिरोली पोलीसांकडून नक्षलवाद्यांना अटक

समुरामवर २ लाखाचे बक्षीस - दुसरा नक्षल समुराम ऊर्फ सुर्या घसेन नरोटे, हा जन मिलिशिया सदस्य असुन, महाराष्ट्र शासनाने त्याचेवर २ लक्ष रुपयेचे बक्षीस जाहिर केले होते. या दोन्ही नक्षलवाद्यांचा खुन, जाळपोळ, चकमक अशा अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असून, सदर अटक नक्षलवाद्यांचा पुढील तपास गडचिरोली पोलीस दल (Gadchiroli police) करीत आहे.

इतक्या' रुपयांचे बक्षीस - दोन्ही नक्षलवाद्यांची विचारपुस केली असता, त्यांना वरीष्ठ नक्षलवादी कॅडरकडुन उत्तर गडचिरोलीमध्ये खंडित झालेल्या दलम कारवाया पुर्ववत करण्याकरीता पाठवल्याबाबतची माहीती दिली. परंतु या दोघांच्या अटकेमुळे त्यांच्या विघातक प्रयत्नांना वेळीच आळा घालण्यात गडचिरोली पोलीस दलाला यश मिळाले आहे. ऑक्टोबर २०२० ते आतापर्यंत एकूण १६ नक्षलवाद्यांना अटक (शासनाने जाहिर केलेले एकुण बक्षीस ६६ लक्ष रूपये) करण्यात आली आहे. १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण (शासनाने जाहिर केलेले एकुण बक्षीस १ कोटी २४ लक्ष रूपये) केले आहे. तर ५५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. (police arrested naxalites) (शासनाने जाहिर केलेले एकुण बक्षीस ४ कोटी १० लक्ष रुपये).

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.