ETV Bharat / state

नक्षलवाद्यांना स्फोटक साहित्य पुरवणाऱ्या चौघांना गडचिरोली पोलिसांकडून अटक - cordex wire supply naxalite arrest gadchiroli

विघातक कारवाया करण्यासाठी नक्षल्यांना स्फोटक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या चार जणांना अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील पोलिसांनी भंगारामपेठा गावातून अटक केली. त्यांच्याकडून ३ हजार ५०० मीटर लांबीचे कार्डेक्स वायरचे १० बंडल जप्त करण्यात आले आहेत.

explosive supply naxal arrest Bhangarampetha
कार्डेक्स वायर जप्त गडचिरोली
author img

By

Published : Feb 20, 2022, 4:25 PM IST

गडचिरोली - विघातक कारवाया करण्यासाठी नक्षल्यांना स्फोटक साहित्याचा पुरवठा करणाऱ्या चार जणांना अहेरी तालुक्यातील दामरंचा येथील पोलिसांनी भंगारामपेठा गावातून अटक केली. त्यांच्याकडून ३ हजार ५०० मीटर लांबीचे कार्डेक्स वायरचे १० बंडल जप्त करण्यात आले आहेत.

आरोपींना नेताना पोलीस
explosive supply naxal arrest Bhangarampetha
आरोपींचे छायाचित्र

हेही वाचा - Sarakka-Sammakka Jatra : सारक्का-सम्मक्का वनदेवातांची जत्रेला गर्दी

राजू गोपाल सल्ला (वय ३२, रा. आसिफनगर, जि. करीमनगर, तेलंगणा) काशिनाथ ऊर्फ रवी मुल्ला गावडे(वय २४, रा. भंगारामपेठा ता. अहेरी) साधू लच्या तलांडी (वय ३० व मोहम्मद कासिम शादुल्ला रा. आसिफनगर, तेलंगणा) अशी आरोपींची नावे असून, छोटू उर्फ सिनू मुल्ला गावडे हा पाचवा आरोपी फरार झाला आहे.

शनिवारी १९ फेब्रुवारीला दामरंचा उपपोलीस ठाण्यातील पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे जवान पोलीस उपनिरीक्षक सचिन घोडके यांच्या नेतृत्वात नक्षलविरोधी अभियान राबवीत असताना भंगारामपेठा येथून स्फोटक साहित्य ताब्यात घेऊन चार जणांना अटक करण्यात आली. हे चारही जण तेलंगणा राज्यातून दामरंचामार्गे छत्तीसगडमध्ये कावस वायर या स्फोटक साहित्याचा नक्षल्यांना पुरवठा करणार होते. बीजीएल, हँडग्रेनेड, बॉम्ब आणि आयईडी ही स्फोटके तयार करण्यासाठी नक्षलवादी कार्डक्स वायरचा वापर करतात. नजीकच्या काही दिवसांत नक्षलवादी या साहित्याद्वारे घातपात घडवून आणण्याच्या तयारीत होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा - Gadchiroli Encrochment : गडचिरोली शहरातील अतिक्रमण विरोधी कारवाई विरोधात संताप; फुटपाथ धारकांचा नगर परिषदेवर मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.