ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात पुरेसे ऑक्सिजन बेड्स व रेमडेसिवीर उपलब्ध होणार – एकनाथ शिंदे - Gadchiroli Corona Update

गडचिरोली जिल्ह्यात पुरेसे ऑक्सिजन बेड्स व रेमडिसीवर उपलब्ध होणार, असल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. जिल्हयातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता शिंदे यांनी आज आरोग्य विभागासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली, या वेळी ते बोलत होते.

गडचिरोली
गडचिरोली
author img

By

Published : Apr 23, 2021, 10:18 PM IST

गडचिरोली - पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हयात ऑक्सिजन पुरवठा, बेड्सची नव्याने निर्मिती करण्यासह रेमडेसिवीर औषधांच्या पुरवठयाबाबत तातडीने मंजूऱ्या मिळतील अशी ग्वाही दिली. जिल्हयाच्या ऑक्सिजन, रेमडेसिवीर व इतर औषधांचा मंजूर व अतिरिक्त कोठ्यासाठी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्री तसेच संबंधित सचिवांना दूरध्वनी द्वारे मागणी केली. यावेळी जिल्हयात तातडीने ही मागणी पूर्ण केली जाईल असे ते यावेळी म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या लक्षात घेता त्यांनी आज आरोग्य विभागासह जिल्ह्यातील महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली.

ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू करणेबाबत निर्देश -

जिल्ह्यातील ऑक्सिजन बेड वाढवणे आवश्यक असल्याचे सांगून यासाठी आवश्यक ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प तातडीने बसवून पूर्ण करा अशा सूचना दिल्या. यामध्ये येत्या आठवड्यात गडचिरोली सामान्य रूग्णालयातील 265 सिलेंडरचा ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू होत असून दुसरा 135 सिलेंडरचा ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू करत आहोत, अशी जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली. पालकमंत्र्यांनी यावेळी भविष्यातील ऑक्सिजनची गरज लक्षात घेवून सिरोंचा, आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा, वडसा, कोरची व एटापल्ली या ठिकाणी सुद्धा कमी क्षमतेचे ऑक्सिजन जनरेटर प्रकल्प सुरू करणेबाबत निर्देश दिले. पालकमंत्र्यांनी रूग्णांचे ऑक्सिजन मुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी तालुकास्तरावर ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर खरेदी करण्याच्या सूचना केल्या ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटरचे वाटप तालुकास्तरावरील कोरोना रूग्णालयात तातडीने केले जाणार आहे. जिल्हयात ऑक्सिजन बेड्स वाढवणे आवश्यक असून त्याप्रमाणे सिरोंचा, वडसा अशा ठिकाणी तातडीने ती वाढवावित असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडून 200 रेमडेसिवीर-

पालकमंत्र्यांनी 200 रेमडेसिवीर इंजेक्शन्स आरोग्य विभागाकडे सुपूर्द केली. यावेळी ते म्हणाले की, कोरोना रूग्णांची जास्त औषधे घेण्याची इच्छा असते. मात्र, डॉक्टरांनी आवश्यक असलेल्यांनाच रेमडेसिवीर किंवा कोणतेही इतर उपचार द्यावेत. संपूर्ण देशासह राज्यात ऑक्सिजन म्हणा किंवा रेमडेसिवीरसारख्या औषधांचा तुटवडा आहे. उपलब्ध साठा गरजूंना मिळेल यासाठी आरोग्य विभागाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे, असे ते पुढे म्हणाले.

आमदार ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिकेसाठी देणार निधी -

जिल्हयातील आमदारांनी प्रत्येकी एक-एक कोटी रूपये निधी ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर पालकमंत्र्यांनी सर्वांचे स्वागत केले. यातून तालुका स्तरावरती ऑक्सिजन कॉन्संस्ट्रेटर व रुग्णवाहिका कोरोना काळासाठी महत्त्वाचे योगदान देतील असे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.

जिल्हा नगरपालिका प्रशासनाला 5 कोटी रुपये कोरोना निधी -

नगरपालिकांच्या माध्यमातून कोविड नियंत्रणासाठी अनेक प्रकारची कामे होत असतात. शहरात कोविड रूग्ण संख्या मोठ्या प्रमाणात असते. यासाठी विविध तातडीच्या उपाययोजना राबविण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा नगरपालिका प्रशासनाला पाच कोटी रूपये आकस्मिक निधी देण्याचे जाहीर केले. हा निधी जिल्ह्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत यांना वाटप करण्यात येणार आहे.

नगरपरिषद गडचिरोलीला सेवाभावी डॉक्टरांच्या रूग्णालयासाठी निधी -

गडचिरोली शहरातील सेवाभावी डॉक्टरांनी प्रशासनाकडे 100 बेडसाठी कोविड रूग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यासाठी आवश्यक निधी नगरपालिका प्रशासनाला उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. रूग्णालयासाठी आवश्यक तरतुदींची तपासणी करून सदर 100 कोविड बेडच्या रूग्णालयाला आरोग्य विभागाने मंजुरी प्रदान करावी, अशा सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. या रूग्णालयासाठी नगरपरिषदेला दिलेला निधी हा संपूर्ण दवाखान्याच्या व्यवस्थापनासाठी खर्च करण्यात येणार आहे. हा निधी नगरविकास विभागाकडून देण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.