ETV Bharat / state

वाघाच्या हल्ल्यात पाच जनावरे ठार; गडचिरोलीतील चुरचुरा जंगलातील घटना - churchura forest

गडचिरोलीतील चुरचुरा येथील जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन ५ जनावरांना ठार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली.

मृत गाय आणि वाघाच्या पायाचे ठसे
author img

By

Published : Jul 4, 2019, 7:27 PM IST

गडचिरोली - चुरचुरा येथील जंगल परिसरात वाघाने हल्ला करुन ५ जनावरांना ठार केल्याची घटना बुधवारी सायंकाळी उघडकीस आली. विशेष म्हणजे घटनास्थळावर वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

चुरचुरा येथील गावाला लागूनच असलेल्या जंगलात चरायला गेलेल्या यशवंत उरकुडे यांच्या मालकीचे एक वासरू आणि एक गाय, गजानन शिवणकर यांच्या मालकीचे एक वासरू, अशोक पेंद्राम यांचा एक बैल तर कवडू म्हशाखेत्री यांच्या एका गायीला बुधवारी सायंकाळी वाघाने ठार केल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळावर वाघाच्या पायांचे ठसे आढळून आल्याने वाघानेच पाचही जनावरांना ठार केल्याचे निदर्शनास आले. यामुळे जनावर मालकांचे एकूण ६८ हजारांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा केला. त्यांनी घटनेबाबत वनरक्षक एन. टी. गडपायले यांना माहिती दिली. आज वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक डी. एफ. विवरेकर, सहायक उपवनसंरक्षक घोंगडे, वनपरिक्षेत्राधिकारी चांगले, क्षेत्र सहायक बोरावार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी वनरक्षक गडपायले यांनी घटनास्थळ परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती दिली.

Intro:वाघाच्या हल्ल्यात पाच जनावरे ठार ; गडचिरोलीतील चुरचुरा जंगलातील घटना

गडचिरोली : तालुक्यातील चुरचुरा येथील जंगल परिसरात वाघाने हल्ला करून पाच जनावरांना ठार केल्याची घटना काल आज गुरुवारी उघडकीस आली. विशेष म्हणजे घटनास्थळावर वाघाच्या पायाचे ठसे आढळून आल्याने गावकºयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.Body:चुरचुरा येथील गावाला लागूनच असलेल्या जंगलात चरावयास गेलेल्या यशवंत उरकुडे यांच्या मालकीचा एक गोरा व एक गाय, गजानन शिवणकर यांचा एक गोरा, अशोक पेंद्राम यांचा एक बैल तर कवडू म्हशाखेत्री यांच्या एका गायीला वाघाने ठार केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास उघडकीस आली. घटनास्थळावर वाघाच्या पायांचे ठसे आढळून आल्याने वाघानेच पाचही जनावरांना ठार केल्याचे निदर्शनास आले. यामुळे जनावर मालकांचे एकूण ६८ हजारांचे नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच वाचर ईश्वर गेडाम, नितीन गेडाम यांनी घटनास्थळावर जावून पंचनामा केला. वाचर ईश्वर गेडाम यांनी घटनेबाबत वनरक्षक एन. टी. गडपायले यांना माहिती दिली. आज ४ जुलै रोजी वडसा वनविभागाचे उपवनसंरक्षक डी. एफ. विवरेकर, सहाय्यक उपवनसंरक्षक घोंगडे, वनपरिक्षेत्राधिकारी चांगले, क्षेत्रसहाय्यक बोरावार यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. घटनास्थळ परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार असल्याची माहिती वनरक्षक गडपायले यांनी दिली.Conclusion:सोबत फोटो आहेत
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.