ETV Bharat / state

चतुरस्त्र हत्तीण!!! गडचिरोलीची हत्तीण चक्क हापसून पिते पाणी, पाहा VIDEO - video social media viral

महाराष्ट्रातील नावाजलेल्या पर्यटनस्थळापैंकी एक असलेल्या म्हणजे गडचिरोलीमधील कमलापुरातील हत्ती कॅम्प आहे. या हत्ती कॅम्पमध्ये वनविभागाचे नऊ हत्ती आहेत. त्यातील रूपा नावाच्या हत्तीणीने कुणीही शिकवले नसताना माणसाप्रमाणे हापसीला (हातपंप) सोंडेने हापसून पाणी पीताना आढळली आहे. एका पर्याटकाने ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद केली आहे.

हत्तीण
हत्तीण
author img

By

Published : Jun 7, 2021, 4:03 PM IST

Updated : Jun 7, 2021, 6:02 PM IST

गडचिरोली - महाराष्ट्रातील नावाजलेल्या पर्यटनस्थळापैंकी एक गडचिरोलीमधील कमलापुरातील हत्ती कॅम्प आहे. या हत्ती कॅम्पमध्ये वनविभागाचे नऊ हत्ती आहेत. त्यातील रूपा नावाच्या हत्तीणीने कुणीही शिकवले नसताना माणसासारखे हापसीला (हातपंप) सोंडेने हापसून पाणी पीताना आढळली आहे. एका पर्याटकाने ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद केली आहे.

दक्षिण गडचिरोली भागातील अहेरी तालुका मुख्यालयापासून 50 किमीवर कमलापूर गाव आहे. येथे उच्चप्रगतीचे साग झाडांचे घनदाट जंगल, मोठा वन तलाव आहे. वनविभागाच्या डोंगरदरऱ्यातून लाकुड खेचून आणण्यासाठी येथे वन विभागाच्या 3 नर व 6 मादा हत्ती आहे. सध्या आधुनिक यंत्रणा पोहोचल्याने हत्तींच्या साहाय्याने मोठ-मोठ्या डोंगरावरुन लाकूड आणण्याचे सध्या बंद केले आहे.

हत्तीण चक्क माणसासारखे हापसून पिते हापसीतील पाणी

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल

हत्तीण चक्क माणसाप्रमाणे हातपंपाचा दांडा स्वत:च्या सोंडेने हापसून पाणी काढते व तहन भागवते. या बाबतीत तेथील वन विभागाचे कर्मचारी सांगतात की, हत्ती कॅम्प जवळच हातपंप आहे. येथे ही रुपा नावाची हत्तीन नेहमी अशा पद्धतीने पाणी पिण्यासाठी येत असते. वन विभागाने आपल्या हत्तींसाठी मोठा तलाव बनविला आहे. दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा - शिर्डी साईमंदिर सुरू करा, अन्यथा आंदोलन; ग्रामस्थांचा इशारा

Last Updated : Jun 7, 2021, 6:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.