ETV Bharat / state

स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी पोहचली 'या' गावात वीज; परिसरातील इतर गावे विजेच्या प्रतीक्षेत

भामरागड तालुक्यातील विसमुंडी या आदिवासी गावात तब्बल 70 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीज जोडणी करण्यात आली आहे. गुरुवारी तहसीलदार कैलास अंडिल यांच्या हस्ते विसमुंडी येथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले. विसमुंडी येथील गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत आनंदाचा क्षण साजरा केला.

Electricity reached in vismundi village  after seventy  years
तब्बल ७० वर्षांनी पोहचली वीज
author img

By

Published : Nov 28, 2019, 9:21 AM IST

गडचिरोली - भामरागड तालुक्यातील विसमुंडी या आदिवासी गावात तब्बल 70 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर वीज जोडणी करण्यात आली आहे. गुरुवारी तहसीलदार कैलास अंडिल यांच्या हस्ते विसमुंडी येथील ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले. विसमुंडी येथील गावकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत आनंदाचा क्षण साजरा केला.

'या' गावात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षांनी पोहचली वीज

हेही वाचा - सौर ऊर्जेवरील दुहेरी नळयोजनेमुळे मेडपल्ली, हेमलकसामध्ये दिवसभर पाणीपुरवठा

विसमुंडी या अदिवासी बहुल गावातील नागरिकांसाठी हा खरा तर क्रांतीचा दिवस होता. एकिकडे भारत हा महासत्ता होण्याचे स्वप्न पाहत आहे. तशी ध्येय धोरणे आखत देश वाटचाल करत असताना या गावात मात्र, स्वातंत्र्यानंतर तब्बल 70 वर्षांनी वीज जोडणी केली जाते. लोकांच्या आशेचा प्रकाश तब्बल 70 वर्षांनी पल्लवीत होत आहे.

उद्घाटन प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद मेश्राम, तलाठी राममूर्ती गड्डमवार, कोतवाल दौलत तलांडेसह गावकरी उपस्थित होते. जिल्हा नियोजन व विकास योजनेतून गावाचे विद्युतीकरण तसेच सौभाग्य योजनेतून पाच वर्षापूर्वीच कामे हाती घेतली होती. परंतु, अर्धवट काम करून संबंधीत ठेकेदार बेपत्ता झाले होते. त्यामुळे काम रखडले. याबाबत गावकऱ्यांनी अनेक वेळा निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून अंधाराचा सामना करावा लागत होता.

गावकरी तहसीलदारांना भेटल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे पाठपुरावा केला. याची दखल घेऊन, जिल्हाधिकाऱ्यांनी कामाला गती आणण्याचे आदेश दिले होते.

विसमुंडी गावात वीज पोहोचली मात्र रस्ते अजूनही नाहीत -

विसमुंडी हे गाव जिल्हा मुख्यालयापासून 200 किमी अंतरावर आहे. तर तालुका मुख्यालयपासून 35 किमी अंतरावर आहे. या गावात जाण्यासाठी अजूनही रस्ते नाहीत, जंगलातून बैलगाडीच्या कच्चा मार्गानेच नागरिकांना डोंगर दऱ्यातून वाट काढावी लागते. अशा स्थितीत वीज सुरू केल्याबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह, तहसीलदार कैलास अंडिल, विधुत वितरण अधिक्षक अभियंत अनिल बोरसे, कार्यकारी अभियंता मेश्राम यांचे गावकऱ्यांनी आभार व्यक्त केले आहे.

'या' गावात अजूनही वीज पोहोचली नाही -

अदिवासी परिसरातील कत्रणगट्टा, मर्दहुर व गुंडपुरी या गावातील ग्रामस्थांनी संघर्ष करूनही अजूनही या गावात वीज जोडणी केलेली नाही.

हेही वाचा - गडचिरोलीत जिल्हा परिषदेच्या ७० ते ८० शाळा बंद करण्याच्या हालचाली

Intro:गडचिरोली जिल्ह्यातील वीसमुंडी येथे तब्बल 70 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर त्याआदीवासी गावात वीज जोडणी करण्यात आली.दि 26/11/2019 ला भामरागड चे तहसीलदार कैलास अंडिल यांच्या हस्ते वीसमुंडी येथील ट्रान्सफॉर्मर उदघाटन करण्यात आला .
याउदघाटन प्रसंगी तहसीलदार यांच्या गाव शिवारातुन आदीवासी परंपरागत ढोल सनाई वाध्यने स्वागत केले. त्यावेळी तालुका वैधकीय अधिकारी डॉ.मिलिंद मेश्राम ,तलाठी राममुर्ती गड्डमवार , कोतवाल दौलत तलांडे सह सर्वगावकरी उपस्थित होते .Body:वीसामुंडी येथे वीज नसल्याने नागरिकांना डिजटल दुनया पासुन वंचित रहावे लागत होता .रात्रीच्या सुमारास शेकोटी पेटवुन दिवस काढावे लागत होते .जिल्हा नियोजन व विकास यौजनेतुन गावाचे विधुतीकरण तसेच सौभाग्य योजनेतुन नागरिकांना वीज जोडणी करण्याची द्रुष्टीने गेल्या पाच वर्षापुर्वीच काम हाति घेतले होते.परंतु खांब तार जोडले अर्धवट काम करुन सदर ठेकेदार बेपत्ता झाले होते .त्यामुळे काम रखळले ,याबाबतीत अनेक वेळा निवेदवन दिले ,सुरु करण्याचे मागणी केले. मात्र अधिकारी पदाधिकारी याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक वर्षांपासून अंधारचा सामना करावे लागत होते .याविषयावर गावकर्यांनी तहसीलदारंच भेट घेऊन वीज पुरवठा सुरु करण्यची मागणी केले. त्यांनी सदर काम कुठे थांबले आहे ,याची पाटपुरावा जिल्हाधीकारी शेखर सिंह यांचाकडे केले. लगेच दखल घेऊन ,गेल्या पाच सहा वर्षापासुन रखडलेला काम सुरवात करुन वीज जोडण्यची काम पुर्ण करण्यात आले.दि.26.11.2019 रोजी तहसीलदार यांच्या हस्ते वीज पुरठा शुभारंभ करण्यात आले.त्यावेळी परिसरात कत्रणगट्टा , मर्दहुर व गुंडपुरी वासीयांनी उपस्थित दर्षवुन आपल्या गावातही वीजेच मागणी केले ,लवकरच तिथे वीजेच काम सुरु करुन वीज पोहचविण्याच आस्वसन दिले .वीसमुंडी हे गाव जिल्हा मुख्यालय पासुन 200 किमी अंतरावर आहे .तसेच तालुका मुख्यालयपासुन ३५ किमी अंतरावर आहे.यागावात जाण्यासाठी रस्ते नाहीत .जंगलातुन बैलबंडीचे कच्चा मार्गानेच नागरिकांना डोंगरदर्यातुन वाट काढावी लागते .अशास्थितीत वीज सुरु केल्या बद्धल जिल्हाधिकारी शेखर सिंह ,तहसीलदार कैलास अंडिल,विधुत वितरण अधिक्षक अभियंत अनिल बोरसे ,कार्यकारी अभियंता मेश्राम यांचा आभार व्यक्त केल.Conclusion:फोटो व विजुवल्स
बाईट -तहसीलदार कैलास आंडिल यांच्या
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.