गडचिरोली - अहेरी मतदार संघातील राष्ट्रवादी पक्षाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम ( Naxal Threat To MLA Dharmarao Baba Atram ) यांना नक्षलवाद्यांकडून धमकीचे पत्र आले आहे. सुरजागड ( Surjagad Project Gadchiroli ) येथील प्रकल्पावरून हे धमकीचे पत्र आले आल्याबाबतचा मुद्दा विधिमंडळात अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी उपस्थित केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी यावर उत्तर देताना आमदार धर्मराव बाबा आत्राम यांना सर्व योग्य सुरक्षा दिली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी आपण गडचिरोलीचे पालकमंत्री असताना मलाही नक्षलवाद्यांच्या धमक्या ( Naxal Threat To Eknath Shinde ) आल्या होत्या. मात्र तेव्हा मला का सुरक्षा नाकारण्यात आली, असा हल्लाबोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी विरोधकांवर केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्माराव बाबा आत्राम ( Nationalist Party MLA Dharmarao Baba Atram ) यांना नक्षलवाद्यांची धमकी ( Naxal Threat To MLA Dharmarao Baba Atram ) आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी सरकारने तात्काळ सुरक्षा देण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी आज सदनात केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्माराव बाबा आत्राम यांना गडचिरोलीतील नक्षलवाद्यांनी धमकी दिल्याचा गंभीर मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात उपस्थित केला.
नक्षलवाद्यांनी काढली धमकीची प्रेस नोट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्माराव बाबा आत्राम यांना धमकी देण्यासाठी नक्षलवाद्यांनी थेट प्रेस नोट काढली. गडचिरोली हा आदिवासी जिल्हा असून सुरजागड येथे लोहखनिज प्रकल्प ( Surjagad Iron Project Gadchiroli ) सुरू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि नक्षलवाद्यांमध्ये वाद उफाळून आला आहे. लोकप्रतिनिधींनी विरोध केल्यानंतरही धमकी देण्यात आली आहे. याची गंभीर दखल घेऊन धर्माराव बाबा आत्राम यांना तात्काळ सुरक्षा द्यावी, शिवाय प्रशासनालाही सुरक्षा देण्यात यावी, अशी मागणीही अजित पवार ( Opposition Leader Ajit Pawar ) यांनी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर पलटवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्माराव बाबा आत्राम (Naxal Threat To MLA Dharmarao Baba Atram )यांना सुरक्षा देण्यात येईल असी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी दिली. त्यासह त्यांच्या कुटूंबियांनाही सुरक्षा देवू असेही मुख्यमंत्र्यांनी दिली. मात्र, आपण गडचिरोलीचे पालकमंत्री असताना अशा पद्धतीची धमकी आपल्यालाही आली होती. पण तत्कालिन सरकारने आपल्याला सुरक्षा का मिळू दिली नाही, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Chief Minister Eknath Shinde ) यांनी यावेळी उपस्थित केला. याची री ओढत तत्कालिन गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनीही यांदर्भात सुरक्षा पुरवण्यासाठी आपण नस्ती तयार करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Shiv Sena Chief Uddhav Thackeray ) यांच्या कार्यालयाकडे पाठवली होती. पण त्यावर कधीच निर्णय घेतला गेला नाही, असे स्पष्ट केल्याने विरोधकांची चांगलीच गोची झाली.
आत्राम यांना तात्काळ सुरक्षा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्माराव बाबा आत्राम (Naxal Threat To MLA Dharmarao Baba Atram )यांना आलेल्या धमकीची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. त्यांना तात्काळ सुरक्षा देण्यात येईल. सध्या नक्षल दलममध्ये गडचिरोलीचे तरूण नाहीत तर त्यांना छत्तीसगड ओडीसामधून तरूण आणावे लागत आहेत. राज्य सरकारने गडचिरोलीमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. विकास कामे केली, याचाच हा परिणाम आहे. मात्र, सरकार नक्षलवाद्यांना घाबरत नाही, असेही देवेंद्र फडणवीस ( DCM Devendra Fadnavis ) यांनी सभागृहात सांगितले.