ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार; पाचव्यांदा भामरागडचा संपर्क तुटला

भामरागड लगतची पर्लकोटा नदी धोक्याच्या पातळीवर आहे. तर, आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुमरगुडा नाल्याला पूर आल्याने यावर्षी पाचव्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पाचव्यांदा भामरागडचा संपर्क तुटला
author img

By

Published : Sep 4, 2019, 1:00 PM IST

गडचिरोली - दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार सुरू आहे. या पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. भामरागड लगतची पर्लकोटा नदी धोकाच्या पातळीवर आहे. तर, आलापल्ली-भामरागड मार्गावरील कुमरगुडा नाल्याला पूर आल्याने यावर्षी पाचव्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिला तर, पर्लकोटा नदीवरील पुल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस; पाचव्यांदा भामरागडचा संपर्क तुटला

27 जुलैला चार दिवस झालेल्या पावसाने पर्लकोटा नदीला पूर आल्याने पहिल्यांदा भामरागड तालुक्यातील 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर रस्ता सुरू होऊन चोवीस तास उलटत नाही तोच पुन्हा मुसळधार पाऊस पडल्याने दुसऱ्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला होता. पुन्हा 6 ऑगस्टपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पंधरा दिवसात तिसऱ्यांदा भामरागडचा संपर्क तुटला आहे. यानंतर चौथ्यांदा पुन्हा तीन दिवस संपर्क तुटला होता.

हे ही वाचा - गडचिरोलीतील कन्नमवार जलाशय 'ओव्हरफ्लो'; पर्यटकांची गर्दी वाढली

आलापल्ली ते भामरागड दरम्यानचे अनेक पुलं पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात राञीपासुन मुसळधार पाऊस सुरु असल्याने अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा ते देचलीपेठा दरम्यान किस्टापुर नाल्यालाही पुर येण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात वारंवार भामरागडचा संपर्क पुरामुळे तुटत असल्याने या नदीवर नव्या पुलाचे बांधकाम करण्याची गरज आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत.

हे ही वाचा - गडचिरोलीत मुसळधार पाऊस; अनेक मार्ग बंद

Intro:गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस : यावर्षी पाचव्यांदा भामरागडचा संपर्क तुटला

गडचिरोली : दोन दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. भामरागड लगतची पर्लकोटा नदी धोकाच्या पातळीवर आहे. तर आलापल्ली- भामरागड मार्गावरील कुमरगुडा नाल्याला पूर आल्याने यावर्षी पाचव्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला आहे. जोरदार पाऊस असाच सुरु राहीला तर पर्लकोटा नदीच्या पुलावर पाणी चढण्याची शक्यता आहे .Body:27 जुलैला चार दिवस झालेल्या पावसाने पर्लकोटा नदीला पूर आल्याने पहिल्यांदा भामरागड तालुक्यातील 100 हून अधिक गावांचा संपर्क तुटला होता. त्यानंतर मार्ग सुरू होऊन चोवीस तास उलटत नाही तोच पुन्हा मुसळधार पाऊस झाल्याने दुसऱ्यांदा भामरागड तालुक्याचा संपर्क तुटला. पुन्हा सहा ऑगस्टपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने पंधरा दिवसात तिसऱ्यांदा भामरागडचा संपर्क तुटला आहे. त्यानंतर पुन्हा तीन दिवस चौथ्यादा संपर्क तुटला होता.

आलापल्ली ते भामरागड दरम्यानचे अनेक पुलं पाण्याखाली गेले आहेत. जिल्हयात राञीपासुन मुसळधार पाऊस सुरु असल्याने अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा ते देचलीपेठा दरम्यान किस्टापुर नाल्यालाही पुर येण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात वारंवार भामरागडचा संपर्क पुरामुळे तुटत असल्याने या नदीवर नव्या पुलाचे बांधकाम करण्याची नितांत गरज आहे. मुसळधार पावसामुळे गडचिरोली शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत.

Conclusion:सोबत व्हिज्युअल आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.