ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात आणखी एक कोरोना रुग्ण; पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6 वर

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यापासून ग्रीन झोनमध्ये असणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6 वर पोहोचली आहे. ही बाब जिल्ह्यातील नागरिकांसाठी चिंतेची आहे.

district civil hospital gadchiroli
जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली
author img

By

Published : May 20, 2020, 8:09 AM IST

Updated : May 20, 2020, 12:00 PM IST

गडचिरोली- जिल्ह्यात मंगळवारी आणखी एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. गडचिरोली जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ६ झाली आहे.

सोमवारी जिल्ह्यात ५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यानंतर १० ठिकाणे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली. मंगळवारी सायांकाळी ७ वाजता एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नव्याने आढळलेला रुग्ण हा आरमोरी तालुक्यातील शंकरनगर येथील केंद्रात संस्थात्मक विलगीकरणात होता.

६ वा कोरोनाबाधित रुग्ण यापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या ५ रुग्णांसोबत प्रवास केलेल्यांच्या संपर्कातील होता, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. शंकरनगर येथील विलगीकरण केंद्रातील रुग्णाला जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात नेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

Last Updated : May 20, 2020, 12:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.