ETV Bharat / state

गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1924 वर, दहा जणांचा मृत्यू

आज दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. यामध्ये गडचिरोली येथील गोकुळनगर येथील एकाचा समावेश आहे. तो हृदयरोगाने ग्रस्त होता. तर शंकरनगर आरमोरी येथील एक जण कोरोनामुळे दगावला आहे. जिल्ह्यातील एकूण सक्रिय बाधितांची संख्या 537 झाली. तर आत्तापर्यंत बाधित 1924 रुग्णांपैकी 1377 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

गडचिरोली
गडचिरोली
author img

By

Published : Sep 20, 2020, 1:06 AM IST

गडचिरोली - जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 1924 वर पोहोचली आहे. तर आजपर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी 54 जणांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली. तसेच नवीन 18 जण कोरोनाबाधित आढळून आले. तर गडचिरोली व आरमोरी येथील प्रत्येकी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 23 ते 30 सप्टेंबर आठ दिवस जनता कर्फ्यु पाळण्याचा निर्णय गडचिरोली शहरातील व्यापारी असोसिएशनने घेतला आहे.

आज आढळून आलेल्या नवीन 28 बधितांमधे गडचिरोली 16, चामोर्शी 7, मुलचेरा 1 व अहेरी 4 अशा 28 जणांचा समावेश आहे. गडचिरोलीतील 16 जणांमधे सेमाना रस्त्यावरील एक जण, नवेगावमधील दोघे, रामपुरी वार्डातील एक जण, हनुमान वार्डातील एक जण, रामनगर येथील एक जण, कॅम्प भागातील एक जण, कन्नमवार वार्डातील एक जण, आयटीआय चौकातील एक जण, शिवाजीनगर येथील दोघे, वार्ड नंबर 15, महुर नांदेड येथून आलेले एक जण यांचा समावेश आहे. चामोर्शी येथील 7 जणांमध्ये आष्टी येथील सहा जण, किष्टापूर येथील एक जण, मुलचेरा तालुक्यातील एक जण सुंदरनगर, अहेरी येथील चार जणांमध्ये देचालीपेठा येथील एक जण, आलापल्ली येथील दोघे आणि मरपल्ली येथील एक जणांचा समावेश आहे.

आज दोघांचा मृत्यू कोरोनामुळे झाला. यामध्ये गडचिरोली येथील गोकुळनगर येथील एकाचा समावेश आहे. तो हृदयरोगाने ग्रस्त होता. तर शंकरनगर आरमोरी येथील एक जण कोरोनामुळे दगावला आहे. जिल्ह्यातील एकूण सक्रिय बाधितांची संख्या 537 झाली. तर आत्तापर्यंत बाधित 1924 रुग्णांपैकी 1377 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात 10 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा - राज्यात 23 हजार 501 रुग्णांना डिस्चार्ज; आतापर्यंत 8 लाख 57 हजार 933 रुग्ण कोरोनामुक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.