ETV Bharat / state

...तर पुन्हा एकदा जिल्ह्यात लॉकडाऊन करावे लागेल - Corona Latest News Gadchiroli

राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी दीपक सिंगला
जिल्हाधिकारी दीपक सिंगला
author img

By

Published : Feb 16, 2021, 10:11 PM IST

गडचिरोली - राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी, कोरोनाच्या नियमांचे पालन करावे, अन्यथा रुग्ण वाढल्यास पुन्हा एकदा लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिला आहे.

मार्गदर्शक सूचनांचे पालन आवश्यक

कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, मास्कचा वापर करणे, सॅनिटायझर वापरने, काम असेल तरच घराबाहेर पडणे यासारख्या नियमांचे पालन नागरिकांनी करावे, कोरोनाच्या रुग्णांमध्ये काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

यात्रा, लग्न समारंभांमध्ये शिस्त महत्त्वाची

नागरिक कोरोनाबाबत गंभीर नसतील तर पुन्हा एकदा जिल्ह्यात लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागेल. सार्वजनिक कार्यक्रम, यात्रा, लग्नामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमते, नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन करत नसल्यामुळे कोरोना वाढू शकतो, त्यामुळे यात्रा, लग्न समारंभांमध्ये शिस्त महत्त्वाची असल्याचेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. सध्या कोरोना लसीकरण सुरू आहे व रुग्ण संख्याही या महिन्यात कमी झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा कोरोनाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलला असल्याचे जाणवत आहे. मात्र या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढत होत असल्याने, नागरिकांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन देखील यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.