ETV Bharat / state

तेलंगणाच्या धरणाचा गडचिरोलीला फटका; मेडीगट्टाचे दरवाजे बंद केल्याने शेतात पाणी

कोणतीही सूचना न देता तेलंगणा सरकारने राज्याच्या सीमेवरील मेडीगड्डा धरणाचे दरवाजे बंद केल्याने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शेतीला मोठा फटका बसला आहे. यामध्ये सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे.

author img

By

Published : Feb 4, 2020, 3:27 PM IST

medigadda dam news
तेलंगणा सरकारने गोदावरीवर बांधलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्याने गडचिरोलीतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

गडचिरोली - तेलंगणा सरकारने गोदावरीवर बांधलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्याने गडचिरोलीतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कोणतीही सूचना न देता तेलंगणा सरकारने हा निर्णय घेतल्याने सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. परिणामी, उभ्या रब्बी पिकाचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष पसरला आहे.

तेलंगणा सरकारने गोदावरीवर बांधलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्याने गडचिरोलीतील शेतकऱ्यांना मोठा फटका

सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने मेडीगड्डा प्रकल्प उभारला. गतवर्षी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. आता हा प्रकल्प 90 टक्के पूर्ण झाला आहे. प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात असताना कोणतीही पूर्वकल्पना न देता तेलंगणाच्या सिंचन विभागाने पाणी अडवले. त्या दबावाने गोदावरीचे पाणी सिरोंचा तालुक्यातील दहा गावांमधील शेतात शिरले आहे. यामुळे कापूस, मिरचीसह रब्बी हंगामातील शेकडो हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेले आहे. मेडीगड्डा धरणाला एकूण 85 वक्राकार दारे आहेत. हैदराबादला पाणी पोहोचवण्यासाठी प्रमुख चार टप्प्यात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे. प्रकल्पाच्या 13 हजार 74 हेक्टर एकूण बुडीत क्षेत्रापैकी 1227 हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात आहे.

मेडिगड्डा धरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 562 एकर जमीन संपादित करण्यात आली. तेलंगणा सरकारने सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी जमीन धारकांना मोठा मोबदला दिला. मात्र, सिरोंचा तालुक्यातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला न देता हे पाणी आडवल्याने तीव्र रोष पसरला आहे.

Intro:गेट रोखल्याने मेडीगड्डा धरणाचे पाणी शेतपिकांत ; तेलंगणाच्या धरणाचा गडचिरोलीच्या शेतकऱ्यांना फटका

गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेवरील गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बांधलेल्या मेडीगड्डा प्रकल्पाचे गेट कुठलीही सुचना न देता बंद केले. तेलंगणा सरकारच्या या दडपशाहीमुळे गडचिरोलीच्या सिरोंचा तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली. परिणामी उभ्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांत मोठा रोष पसरला आहे.Body:सिरोंचा तालुक्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने मेडीगड्डा प्रकल्प उभारला. गतवर्षी या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. हा प्रकल्प 90 टक्के पूर्ण झाला आहे. प्रकल्प पुर्णत्वाच्या टप्पयात असताना कुठलीही सुचना न देता तेलंगणाच्या सिंचन विभागाने पाणी अडवल. त्या दबावाने गोदावरीच पाणी सिरोंचा तालुक्यातील दहा गावातल्या शेतात शिरल आहे. यामुळे कापुस, मिरचीसह रबी हंगामातील हातात आलेले शेक्डो हेक्टरवरील पीक पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

मेडीगड्डा धरणाला एकूण 85 वक्राकार दारे आहेत. हैदराबादला पाणी पोहोचेपर्यंत सर्व प्रमुख चार टप्प्यात पंपाद्वारे पाणी पुढच्या टप्प्यात टाकलं जाणार आहे. प्रकल्पाच्या 13 हजार 74 हेक्टर एकूण बुडीत क्षेत्रापैकी 1227 हेक्टर क्षेत्र महाराष्ट्रात आहे. मेडिगड्डा धरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील 562 एकर जमीन संपादित केली. तेलंगणा सरकारने आपल्या जनतेच्या सिंचन आणि तृष्णातृप्तीसाठी जमीन मालकांना वाट्टेल ती रक्कम मोबदला म्हणून दिली. मात्र सिरोंचा तालुक्यातील बुडीत क्षेत्रात येणाऱ्या शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला न देता पाणी अडवल्याने तीव्र रोष पसरला आहे.Conclusion:शेतात पाणी शिरल्याचे व्हिज्युअल
बाईट 1) : बापुराव रंगुवार, बाधित शेतकरी तथा उपसरपंच अरडा
बाईट 2) : धर्मराव बाबा आत्राम, आमदार अहेरी.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.