ETV Bharat / state

जिल्हा परिषदेच्या 2 कोटी 86 लाख रुपये लंपासप्रकरणी वित्त व लेखा विभागातील लिपिकास अटक

या अपहारामध्ये आरोपीने युनियन बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपये इतकी रक्कम आरोपींनी काढून नेली. ही रक्कम आरोपींनी रामदूत कन्स्ट्रक्शन कंपनी, उत्कर्ष निर्माण कंपनी, पवनसूत कन्स्ट्रक्शन कंपनी इत्यादी कंपन्यांच्या खात्यांमध्ये वळती केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत ६ आरोपींना ५ ऑगस्टला व त्यानंतर ३ आरोपींना अटक केली.

author img

By

Published : Aug 27, 2020, 6:24 AM IST

gadchiroli zp
गडचिरोली जिल्हा परिषद

गडचिरोली - जिल्हा परिषदेच्या माजी मालगुजारी तलावाच्या 'पूनर्बांधणी व बळकटीकरण' या लेखाशीर्षाखाली असलेल्या युनियन बँकेच्या खात्यातून धनादेशाच्या आधारे तब्बल २ कोटी ८६ लाख रुपये लंपास केले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी जिल्हा परिषदेतील वित्त व लेखा विभागातील एका कर्मचाऱ्यास अटक केल्याने खळबळ उडाली आहे. बलराज जुमनाके (३९), असे आरोपीचे नाव असून, तो वरिष्ठ लिपिक आहे.

या अपहारामध्ये आरोपीने युनियन बँकेच्या खात्यातून आरटीजीएसच्या माध्यमातून तब्बल २ कोटी ८६ लाख १३ हजार ८५१ रुपये इतकी रक्कम आरोपींनी काढून नेली. ही रक्कम आरोपींनी रामदूत कन्स्ट्रक्शन कंपनी, उत्कर्ष निर्माण कंपनी, पवनसूत कन्स्ट्रक्शन कंपनी इत्यादी कंपन्यांच्या खात्यांमध्ये वळती केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने आतापर्यंत ६ आरोपींना ५ ऑगस्टला व त्यानंतर ३ आरोपींना अटक केली.

तपासादरम्यान आरोपी स्नेहदीप सोनी याने अपहार केलेल्या रकमेतून मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरुन तसेच बँकेच्या लॉकरमधून ६० लाख रुपये किमतीचे सोने जप्त केले. त्यानंतर आणखी एक ते दीड कोटी रुपयांचे सोने, हिरे, चांदी व इतर मूल्यवान धातूंचे दागिने पोलिसांच्या हाती लागले. विशेष म्हणजे, अपहाराच्या रकमेतून आरोपींनी खरेदी केलेल्या स्थावर मालमत्तेची कागदपत्रेही पोलिसांच्या हाती लागली आहेत.

या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी दिली. दरम्यान हा तपास वेगाने सुरु असताना एलसीबीने बुधवारी जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागातील वरिष्ठ लिपिक बलराज जुमनाके यास जिल्हा परिषदेतून अटक केली. आधी अटक झालेल्या आरोपींना आपण बँक खात्यासंबंधी माहिती पुरविल्याची कबुली जुमनाके याने दिल्याचे पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.