ETV Bharat / state

Bhamragarh Flood : पर्लाकोटा नदी पुल वाहतुकीसाठी खुला - भामरागड पूर

भामरागड तालुक्यात चार पाच दिवसात मुसळधार पावसामुळे आलापल्ली- भामरागड मार्ग ( Heavy rain in Bhamragad taluka ) बंद होता. आज सकाळी 5 वाजता पुलावरचे पाणी कमी झाले. मात्र, पुलावर काडी, कचरा, मोठी-मोठी लाकडे अडकून पडली होती. पुराचे पाणी ( Bhamragarh Flood ) ओसरताच पर्लाकोटा नदी पुल ( Parlakota river bridge Open ) वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

भामरागड पूर
Bhamragarh Flood
author img

By

Published : Jul 14, 2022, 9:50 PM IST

Updated : Jul 15, 2022, 6:10 AM IST

गडचिरोली - भामरागड तालुक्यात चार पाच दिवसात मुसळधार पाऊसामुळे आलापल्ली- भामरागड ( Heavy rain in Bhamragad taluka ) मार्गावरील कुमरगुड नाला, कुडकेली नाला दुथडी भरुन वाहत होते. मंगळवारी पहाटेपासुनच भामरागड आलपल्ली मार्ग बंद होता. सायंकाळी पर्यंत भामरागड शहरालगत वाहत असलेल्या पर्लाकोटा नदी पुलावर ( Parlakota river bridge ) मंगळवारी सकाळी 5.00 वाजेपर्यंत पुलावर पाणी होते. वाढलेला पूर ( Bhamragarh Flood ) पाहता स्थानिक पोलीस प्रशासनातर्फे खबरदारी म्हणून भमरगड बाजारपेठ पूर्णपणे खाली करुन सुरक्षित स्थळी हटवण्यात आली होती.

भामरागड पूर

हेही वाचा - Tractor Plunged into Water : गुजरातमध्ये मुसळधार पाऊस; खारी नदीत ट्रॅक्टर गेला वाहून, पाहा Video

आज सकाळी 5 वाजता पुलावरचे पाणी कमी झाले. मात्र, पुलावर काडी, कचरा, मोठी-मोठी लाकडे अडकून पडली होती. त्यामुळे तीन दिवसापासून अडकून पडलेल्या प्रवाशांची गैरसोय होत आहे. पुलावर मोठ्या प्रमाणावर गाळ जमा झाल्याने वाहने अडकून पडली होती. एसडीआरएफ पथकाने पुलाची पाहणी केल्यानंतर पुल वाहतूकीसाठी खुला केला आहे. यावेळीतहसीलदार अनमोल कांबळे ,एसडीपीओ नितीन गणापुरे, पो.नि.किरण रासकर, पो.उपनिरीक्षक संकेत नानोटे आदी जण उपस्थित होते.

Heavy rain in Bhamragad taluka
भामरागड तालुक्यात मुसळधार पाऊस

हेही वाचा - Maharashtra and India Rain live : देशातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस ! गुजरात आणि महाराष्ट्रात रेड अलर्ट, पाहा पावसाची स्थिती

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात मागील 48 तासांत संततधार पाऊस ( Continuous rain in Chandrapur district ) सुरू आहे. यामुळे जनजीवन प्रभावीत झाले असून अनेक गावांचा ( Many villages were cut off due to rains ) संपर्क तुटला आहे. मागील 24 तासांत जिल्ह्यातील बल्लारपूर, राजुरा, जिवती या तीन तालुक्यात ( Excessive rainfall in three Tahsil ) अतिवृष्टी झाली आहे. तालुक्यात सरासरी 48 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर, इरई धरणाची तीन दारवाजे उघडण्यात आली आहेत. रविवारी झालेल्या पावसामुळे ब्रह्मपुरी तालुक्यात एक शेतकरी नाल्यात वाहून गेला. तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील काही मध्यम तसेच लघुसिंचन प्रकल्प शंभर टक्के भरले आहे. दरम्यान, इरई धऱणाचे तीन दरवाजे उघडल्यामुळे नदीकाठावरील गावांना प्रशासनाने सर्तकतेचा इशारा दिला आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेनेही शहरातील नदीकाठावरील नागरिकांना सावधिगिरी बाळगावी, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा - Vishalgad Part Collapsed : आधी पन्हाळा आणि आता विशाळगडाचा बुरुज ढासळला; दुर्गसंवर्धन मोहिम कागदावरच!

Last Updated : Jul 15, 2022, 6:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.