गडचिरोली - जिल्ह्यात कोरोनाचा प्रभाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीर गडचिरोली जिल्हाधिकारी दिपक सिंगला यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा जिल्ह्यात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, भामरगड शहरात विना मास्क फिरणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. व्यापारी देखील नियमांचा पालन करताना दिसत नाहीत. त्यामुळे अधिकारी व व्यापाऱ्यांना मास्क घालून कोरोना नियमांचे पालन करण्याच्या सुचना तहसीलदार अनमोल कांबळे यांनी दिल्या आहेत.
"मीच जबाबदार"द्वारे कोरोनाबाबत जनजागृती -
भामरागड बाजार चौकात मात्रू पित्रू क्रुपा जण कल्याण शैक्षणिक संस्था कोटगुल कलापथकाद्वारे "मीच जबाबदार" या आशयाखाली कोरोना संबंधी जनजागृती करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाला भामरागडचे तहसीलदार अनमोल कांबळे, नगर पंचायतचे मुख्याधिकारी सुरज जादव यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि व्यापारी उपस्थित होते. जनजागृत कलावंत महेंद्र ठाकरे भक्ती सागर नागोसे, नाजूका गेडाम, रितू गुरणूले, संजय खोब्रागडे, सुनील मोहर्ले, मंगेश पेंदोर, पुरषोत्तम बावणे, अरुण, साईनाथ भांडेकर, स्थानिक कलाकार कुसराम आदी कलावंतानी "मीच जबाबदार" कोरोनावर गीतनाट्य सादर केले.
कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाई -
या कर्यक्रमात तहसीलदार अनमोल कांबळे यांनी भामरागड शहरातील कोरोना प्रादुर्भाव लक्षत घेऊन नगरपरिषदचे अधिकारी व व्यापाऱ्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे कडक पालन करण्याच्या सूचना दिल्या. शिवाय, कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याचेही आदेश दिले.