ETV Bharat / state

आरमोरी मतदारसंघाचे काँग्रेस उमेदवार आनंदराव गेडाम यांचा अटकपूर्व जामीन नाकारला - maharashtra assembly election

आरमोरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराचे अपहरण करून त्यांना रात्रभर बसवून ठेवल्याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. न्यायालयाने तो अर्ज नामंजूर केला आहे.

आनंदराव गेडाम
author img

By

Published : Oct 16, 2019, 6:42 PM IST

गडचिरोली - आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवाराचे अपहरण करून त्यांना रात्रभर बसवून ठेवल्याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह १३ जणांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आज बुधवारी आनंदराव गेडाम व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन नाट यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला आहे.

आरमोरी पंचायत समितीचे माजी सभापती असलेले बग्गूजी ताडाम हे आरमोरी विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. आपण आपल्या दोन सहकाऱ्यांसह मोटारसायकलने जात असताना बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी अडवून मारहाण केली. त्यानंतर कढोली गावाजवळच्या पुलावर नेऊन प्रचार न करण्याची धमकी दिली. त्यानंतर कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथे नेऊन रात्रभर बसवून ठेवले, अशी तक्रार बग्गू ताडाम यांनी आरमोरी पोलीस ठाण्यात दिली.

हेही वाचा - 'विरोधकांप्रमाणे खोटे बोलून मत मागण्याची गरज नाही'

त्यावरून पोलिसांनी १० ऑक्टोबरला रात्री आनंदराव गेडाम, त्यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम व अन्य ११ जणांवर गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून आनंदराव गेडाम हे फरार होते. आनंदराव गेडाम व जीवन नाट यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. यामुळे गेडाम यांच्या अडचणी वाढणार आहेत.

हेही वाचा - 'भाजप आमदारांसह पदाधिकार्‍यांच्या उदासीन भूमिकेमुळे बंडखोरी'

Intro:आरमोरी विधानसभेचे काँग्रेस उमेदवार आनंदराव गेडाम यांना अटकपूर्व जामीन नाकारला

गडचिरोली : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवाराचे अपहरण करुन त्यांना रात्रभर
बसवून ठेवल्याप्रकरणी आरमोरी पोलिसांनी काँग्रेसचे उमेदवार व माजी आमदार आनंदराव गेडाम यांच्यासह १३ जणांवर गुन्हे दाखल केले होते. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आज बुधवारी आनंदराव गेडाम व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जीवन नाट यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारला आहे.Body:आरमोरी पंचायत समितीचे माजी सभापती असलेले बग्गूजी ताडाम हे आरमोरी विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. आपण आपल्या दोन सहकाऱ्यांसह मोटारसायकलने जात असताना बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास माजी आमदार आनंदराव गेडाम यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम व त्यांच्या दोन सहकाऱ्यांनी आपणास अडवून मारहाण केली. त्यानंतर कढोली गावाजवळच्या पुलावर नेऊन प्रचार न करण्याची धमकी दिली. त्यानंतर कुरखेडा तालुक्यातील सलंगटोला येथे नेऊन रात्रभर बसवून ठेवले, अशी तक्रार बग्गु ताडाम यांनी आरमोरी पोलिस ठाण्यात दिली.

त्यावरुन पोलिसांनी १० ऑक्टोबरला रात्री आनंदराव गेडाम, त्यांचे पुत्र लॉरेन्स गेडाम व अन्य ११ जणांवर गुन्हे दाखल केले होते. तेव्हापासून आनंदराव गेडाम हे फरार होते. आनंदराव गेडाम व जीवन नाट यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर केला. यामुळे गेडाम यांच्या अडचणी वाढणार आहेत.
Conclusion:पासपोर्ट आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.