गडचिरोली - बृहन्महाराष्ट्र योग परिषद अमरावतीशी संलग्न गडचिरोली जिल्हा योग असोसिएशनतर्फे आरमोरी येथे झालेल्या जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत गडचिरोली येथील 8 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय योग स्पर्धेकरिता निवड झाली आहे. आरमोरी येथे झालेल्या स्पर्धेत 8 ते 13 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये अदिती हेमके हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर कावेरी प्यारमवार द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
हेही वाचा - गडचिरोलीत ३ ड्रम मोह सडव्यासह विदेशी दारू जप्त
मुलांमध्ये डेविड जांगी याने प्रथम व प्रज्वल निमगडे याने तृतीय क्रमांक पटकावला. 13 ते 17 वर्षे वयोगटातील मुलींमध्ये राधिका कलंत्री हिने प्रथम व अनुजा म्हशाखेत्री हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
हेही वाचा - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मुस्लिम विरोधी, समाजबांधवानी राष्ट्रपतींना पाठविले निवेदन
25 ते 35 वयोगटात विशाल भांडेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांच्या सोबतच 8 ते 13 वयोगटात मोहित वाघरे आणि 35 ते 50 वर्षे वयोगटात कल्पना म्हशाखेत्री यांचीही या स्पर्धेकरिता निवड झाली आहे. हे सर्वजण शनिवारी राज्यस्तरीय योग स्पर्धेसाठी रवाना झाले. 13 ते 15 डिसेंबर या कालावधीत यवतमाळ येथील बाबासाहेब नांदुरकर अभियांत्रिकी महाविद्यालयात ही स्पर्धा होणार आहे.