गडचिरोली - धानोरा तालुक्यातील ग्यारापत्ती - कोटगुल जंगल परिसरात शनिवारी गडचिरोली पोलिसांच्या सी - 60 जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली (naxals encounter gadchiroli). या चकमकीत नक्षलवाद्यांच्या तीन मोठ्या नेत्यांसह 26 नक्षलवादी ठार (naxals killed in gadchiroli encounter) झाल्याची माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा - Naxals killed in Gadchiroli : चकमकीत 20 पुरुष तर 6 महिला नक्षली ठार; अधिकृत माहिती समोर
गडचिरोली जिल्ह्यातील उपविभाग धानोरा अंतर्गत येणाऱ्या पोलीस मदत केंद्र ग्यारापत्ती परिसरात पीएलजीए सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर कंपनी ४ चा विस्तार करण्यासाठी नक्षली नेता मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) याच्यासह नक्षलवाद्यांचे मोठे शिबीर सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे यांच्या नेतृत्वात मर्दिनीटोला परिसरात गडचिरोली पोलीस दलातील (gadchiroli police) विशेष अभियान पथक (सी - ६०) (C 60 commandos) व विशेष कृती दलाच्या जवानांनी मोहीम सुरू केली. दबा धरून बसलेल्या ९० ते १०० नक्षल्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याचा उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार (naxals encounter) केला. त्यावेळी पोलिसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्रे ठेवून शरण येण्याबाबत आवाहन केले. नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलिसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला.
२६ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले
जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला. ही चकमक (naxals encounter) दुपारी ३.३० वाजेपर्यंत सुरू होती. सुमारे ९.३० तास चाललेल्या या चकमकीत नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. चकमकीनंतर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असताना घटनास्थळावरून २० पुरुष नक्षलवादी ६ महिला, असे एकूण २६ नक्षलवाद्यांचे मृतदेह मिळून आले.
सध्या १६ नक्षलवाद्यांची ओळख पटलेली असून १० मृतक नक्षलांची ओळख पटविणे सुरू आहे. या नक्षलांवर खून, जाळपोळ, चकमक इत्यादी वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. तसेच, यात ५ नग एके ४७ रायफल, १ नग एकेएम युबिजिअल, १ नग एसएलआर रायफल, 1 नग ३०३ रायफल, १ नग २.२ सिंगल बोअर, १ नग इंसास रायफल, पिस्टल व मोठ्या प्रमाणात स्फोटके मिळून आलेत. तसेच, नक्षलवाद्यांच्या दैनंदिन जिवनात वापरात येणारे साहित्य मिळून आले. सी - ६० कमांडोंच्या (C 60 commandos) या धाडसी कामगिरीचे पोलीस उपमहानिरीक्षक संदिप पाटील, पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी कौतुक केले आहे.
हेही वाचा - Gadchiroli Encounter : नक्षलवाद्यांचा देशातील सर्वात मोठा नेता मिलिंद तेलतुंबडे ठार