ETV Bharat / state

गडचिरोलीत आश्रमशाळेतील १०६ विद्यार्थ्यांनींना जेवणातून विषबाधा, ७३ गंभीर - food poisoned

Gadchiroli Food Poisoned : गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत १०६ मुलींना जेवणातून विषबाधा झाली. यापैकी ७३ मुलींची प्रकृती गंभीर आहे.

Gadchiroli Food Poisoned
Gadchiroli Food Poisoned
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 20, 2023, 10:14 PM IST

Updated : Dec 20, 2023, 10:48 PM IST

गडचिरोली Gadchiroli Food Poisoned : गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. तालुक्यातल्या सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रमशाळेत १०६ मुलींना जेवणातून विषबाधा झाली. या मुलींना धानोऱ्याच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यापैकी ७३ मुलींची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. त्यांच्यावर तेथे उपचार सुरू आहेत. इतर मुलींना प्राथमिक उपचारानंतर सुटी देण्यात आली.

मध्यान्ह भोजनातून विषबाधा : मिळालेल्या माहितीनुसार, या आश्रमशाळेतील विद्यार्थीनींना दुपारी १२ वाजताच्या सुमारास जेवण देण्यात आलं. जेवणात कोबी-बटाट्याची भाजी आणि वरण-भाताचा समावेश होता. हे जेवणानंतर थोड्या वेळानं त्यांना उलट्या, मळमळ अन् हगवण सुरू झाली. यानंतर आश्रमशाळेतील शिक्षकांनी ३ वाजताच्या सुमारास ६-७ मुलींना धानोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं.

गडचिरोलीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात हलवलं : या मुलींवर रुग्णालयात प्राथमिक उपचार सुरू असताना आणखी मुलींनाही उलट्या आणि मळमळीचा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना देखील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सायंकाळपर्यंत १०६ विद्यार्थीनींना विषबाधा झाली. या सर्वांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र त्यापैकी काही मुली अतिशय घाबरल्या होत्या, त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. सध्या या मुलींवर गडचिरोलीच्या शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर मुलींना उपचारानंतर सुटी देण्यात आली.

आश्रमशाळेतील जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह : गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुका हा अतिदुर्गम क्षेत्रात येतो. येथील सोडे गावात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून शासकीय मुलींची आश्रमशाळा चालवली जाते. या आश्रमशाळेत आसपासच्या भागातील सुमारे ३८० आदिवासी मुली निवासी स्वरूपात शिक्षण घेतात. आता ही घटना उघडकीस आल्यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांच्या आश्रमशाळेत देण्यात येणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे

हे वाचलंत का :

  1. Cow Died In Pune : पुण्यात बटाट्याचा पाला खाल्ल्यानं 20 गाईंचा मृत्यू तर 40 गाईंना विषबाधा

Last Updated : Dec 20, 2023, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.