ETV Bharat / state

गडचिरोलीतून सीआरपीएफच्या 10 कंपन्या हटवल्या; निवडणुकीत पोलिसांवरील ताण वाढणार - राज्य राखीव पोलीस दल

गडचिरोली जिल्ह्यात नियमित नक्षली कारवाया होत असतात. अलीकडेच महाराष्ट्र दिनी 15 पोलिसांना भुसुरुंग स्फोटात नक्षलवाद्यांनी उडविले होते. त्यानंतर नेहमी जिल्ह्यात नक्षली कारवाया सुरूच आहेत.

गडचिरोलीतून सीआरपीएफच्या 10 कंपन्या हटविल्या
author img

By

Published : Sep 18, 2019, 4:51 PM IST

Updated : Sep 18, 2019, 5:50 PM IST

गडचिरोली - जिल्ह्यातील नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणलेल्या केंद्रीय पोलीस दलाच्या 10 कंपन्या गडचिरोलीतून हटवून काश्मीरमध्ये पाठवण्यात आल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा कमजोर झाली आहे. त्यामुळे राज्य पोलिसांवरील ताण वाढण्याची मोठी शक्यता आहे.

गडचिरोलीतून सीआरपीएफच्या 10 कंपन्या हटवल्या

हेही वाचा - आढावा मतदारसंघाचा : अतिसंवेदनशील 'अहेरी मतदारसंघात' तिरंगी लढतीची शक्यता

गडचिरोली जिल्ह्यात नियमित नक्षली कारवाया होत असतात. अलीकडेच महाराष्ट्र दिनी 15 पोलिसांना भुसुरुंग स्फोटात नक्षलवाद्यांनी उडविले होते. त्यानंतर नित्याने जिल्ह्यात नक्षली कारवाया सुरूच आहेत. जिल्ह्यातील नक्षलवादाच्या समुळ उच्चाटनासाठी यूपीए सरकारने गडचिरोली जिल्ह्यात निमलष्करी दल तैनात केले होते. महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातही ही दले तैनात करण्यात आली. त्यामुळे नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यात केंद्र आणि राज्य सरकारला मोठे यश आले आहे.

हेही वाचा - विधानसभा निवडणूक 2019 : गडचिरोलीत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 9, 37, 113, 191, 192 क्रमांकाच्या 5 बटालियन गडचिरोली, अहेरी, वडसा, धानोरा, एटापल्ली, भामरागड येथे कार्यरत आहेत. या प्रत्येक बटालियनमध्ये 7 कंपन्यांचा समावेश असतो. एका कंपनीत 135 जवान असतात. यापैकी 10 कंपन्या म्हणजेच 1 हजार 350 जवान येथून काश्मीरला हलविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा - पूरग्रस्त भामरागडच्या मदतीच्या सर्वेक्षणासाठी ५५ पथके रवाना - जिल्हाधिकारी शेखर सिंह

कलम 370 हटवल्यानंतर आणि अमरनाथ यात्रेला दहशतवाद्यांची धमकी मिळाल्यानंतर येथील 10 कंपन्या काश्मीरला पाठवण्यात आल्या. त्यामुळे राज्य पोलिसांवरील ताण वाढण्याची मोठी शक्यता आहे. राज्य पोलीस दलाने सुरक्षा दलाची मागणी केल्यास बटालियन परत येऊ शकतात, अशी माहिती सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.

Intro:गडचिरोलीतून सीआरपीएफच्या 10 कंपन्या हटविल्या ; निवडणुकीत पोलिसांवरील ताण वाढणार

गडचिरोली : जिल्ह्यातील नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी आणलेल्या केंद्रीय पोलीस दलाच्या 10 कंपन्या गडचिरोलीतून हटवून काश्मीरमध्ये पाठवण्यात आल्याची गंभीर माहिती समोर आली आहे. यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणा कमजोर झाली असून राज्य पोलिसांवरील ताण वाढण्याची मोठी शक्यता आहे. Body:गडचिरोली जिल्ह्यात नियमित नक्षली कारवाया होत असतात. अलीकडेच महाराष्ट्र दिनी 15 पोलिसांना भुसुरुंग स्फोटात नक्षलवाद्यांनी उडविले होते. त्यानंतर नित्यनेमानं जिल्ह्यात नक्षली कारवाया सुरूच आहेत. या जिल्ह्यातील आणि एकूणच दंडकारण्यातील नक्षलवादाच्या समूळ उच्चाटनासाठी यूपीए सरकारने गडचिरोली जिल्ह्यात निमलष्करी दल तैनात केले होते. महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातही ही दलं तैनात करण्यात आली. त्यामुळे नक्षलवाद्यांवर अंकुश ठेवण्यात केंद्र आणि राज्य सरकारला मोठे यश आले.

गडचिरोली जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 9, 37, 113, 191, 192 क्रमांकाच्या पाच बटालियन गडचिरोली, अहेरी, वडसा, धानोरा, एटापल्ली, भामरागड येथे कार्यरत आहेत. या प्रत्येक बटालीयनमध्ये सात कंपन्यांचा समावेश असतो. आणि एका कंपनीत 135 जवान असतात. यापैकी 10 कंपन्या म्हणजेच 1350 जवान येथून काश्मीरला हलविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 370 कलम हटवल्यानंतर आणि अमरनाथ यात्रेला दहशतवाद्यांची धमकी मिळाल्यानंतर येथील 10 कंपनी काश्मीरला पाठवण्यात आल्या. त्यामुळे राज्य पोलिसांवरील ताण वाढण्याची मोठी शक्यता आहे. राज्य पोलिस दलाने सुरक्षा दलाची मागणी केल्यास बटालियन परत येऊ शकतात, अशी माहिती सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना दिली.Conclusion:सोबत व्हिज्युअल आहेत
Last Updated : Sep 18, 2019, 5:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.