ETV Bharat / state

विधवा वहिनीशी लग्न करून दिराने घालून दिला आदर्श

author img

By

Published : Jul 9, 2019, 2:52 PM IST

धुळे तालुक्यातील कापडणे येथील गणेश बोरसे याचा विवाहानंतर अवघ्या काही वर्षातच विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. यानंतर त्याच्या विधवा पत्नीशी दिराने विवाह करुन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे.

विधवा वाहिनीशी लग्न

धुळे - भावाच्या निधनानंतर दिराने आपल्या विधवा वहिनीशी लग्न करून समाजात एक आदर्श ठेवला आहे. हा विवाह सोहळा धुळे तालुक्यातील कापडणे येथे झाला. सामाजिक परंपरांना फाटा देत झालेला हा विवाह सोहळा सध्या धुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

धुळे तालुक्यातील कापडणे येथील गणेश बोरसे याचा विवाहानंतर अवघ्या काही वर्षातच विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मृत गणेशच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ तसेच विधवा पत्नी रोहिणी व २ वर्षांचा मुलगा आरव असा परिवार आहे. गणेशच्या निधनानंतर त्याच्या पत्नीवर झालेला आघात कधीही भरून न निघणारा असल्याची जाणीव बोरसे परिवाराला झाली. यातूनच तरुण विधवा सून व मुलगा आरव यांची चिंता बोरसे कुटुंबीयांना सतावत होती.

बोरसे कुटुंबाने समाजाच्या रितीरिवाजांना फाटा देत लग्नाबद्दलच्या भावना चेतन व विधवा सून यांच्याकडे बोलून दाखवल्या. त्या दोघांना लग्नासाठी राजी करण्यात आले. बोरसे परिवाराने निवडक नातलगांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावातीलच मंदिरात लग्न सोहळा पार पाडला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर बोरसे, सुरेश बोरसे, माधवराव बोरसे, दगाजी बोरसे, शुभम बोरसे, कैलास बोरसे व नातेवाईकांनी विशेष प्रयत्न केले.

Intro:भावाच्या निधनानंतर दिराने आपल्या वाहिनीशी लग्न करून तिच्या मुलासह तिचा स्वीकार केल्याची सुखद घटना धुळे तालुक्यातील कापडणे येथे घडली आहे. हा विवाह सोहळा सध्या धुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. Body:सुखी संसाराची स्वप्न पाहणाऱ्या मुलीच्या आयुष्याच्याची खरी सुरवात तिचे लग्न झाल्यानंतर होते. आपल्या आयुष्यात येणार जोडीदार, व ७ जन्म तोच मिळावा म्ह्णून केलेले तप -तपश्चर्या अर्थात उपवास. यातच आपल्या प्रेमात परिवाराच्या निमित्त आलेल्या मुलांचा
योग्य पद्धतीने सांभाळ या स्वप्नात वावरत असताना अचानकपणे संसाराच्या भरधाव रथाचे चाक निघून जावे आणि तो रथ मधेच थांबल्यावर झालेली अवस्था याचा प्रत्यय धुळे तालुक्यातील कापडणे गावातील विवाहितेने अनुभवला. भावी आयुष्याची स्वप्ने पाहत असताना मधेच पतीचा दुर्दैवी मृत्यू. व त्याच्यानंतर झालेली दैना, लहान मुलाच्या डोक्यावरून पित्ताचे छात्र हरवल्यावर त्याला धीर कसा द्यावा अशा विवंचनेत सापडलेल्या विधवा महिलेस दिराने हात देत तिचा संसाराचा तो थांबलेला रथ पुढे नेण्याचे धाडस दाखवले आहे. हि कोणतीही काल्पनिक कथा नसून वास्तवात घडलेली घटना आहे धुळे तालुक्यातील कापडणे येथील गणेश बोरसे याच्या विवाहानंतर अवघ्या काही वर्षातच विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाला. मयत गणेशच्या पश्च्यात आई, वडील, लहान भाऊ तसेच विधवा पत्नी व २ वर्षाचा मुलगा आरव असा परिवार आहे. चेतन याच्या निधनानंतर त्याच्या पत्नी व लहान मुलावर झालेला आघात हा कधीही भरून न निघणारा असल्याची जाणीव त्याच्या परिवाराला झाली. यातूनच तरुण विधवा वाहिनी व आपल्या घरातीलच मयत भावाचा वारसदार आरव याच पुढे काय हि चिंता चेतन यास सतावत होती. मात्र जगाचे रीत रिवाज याच्या आड येत होती. हीच परिस्थिती ओळखून बोरसे कुटुंबाने समाजाच्या रितीरिवाजांना फाटा देत आपल्या भावना चेतन व विधवा सून यांच्याकडे मोकळी केली. याचवेळी विधवा रोहिणी माहेरच्यांनाहि विश्वासात घेत त्यांची संमती घेतली. आणि जगापुढे नवा आदर्श घालून देतांनाच बोरसे परिवाराने निवडक नातलगांसह ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा दैदिप्यमान लग्नाचा सोहळा गावातीलच मंदिरात पार पडला. यासाठी सामाजिक कार्यकर्ते किशोर बोरसे, सुरेश बोरसे, माधवराव बोरसे, दगाजी बोरसे, शुभम बोरसे, कैलास बोरसे व नातेवाईकांनी विशेष प्रयत्न केले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.