धुळे - एकीकडे भीषण दुष्काळाला तोंड देताना नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुसरीकडे धुळे महापालिकेच्या जुन्या इमारतीत मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात असून याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. पाण्याचा होणारा अपव्यय थांबवावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
एकीकडे भर उन्हाळयात धुळे शहरात वेळेवर पाणी पुरवठा केला जात नसताना दुसरीकडे मात्र धुळे महापालिकेच्या जुन्या इमारतीत मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. धुळे तालुक्यातील मोरदड तांडा गावात पाणी भरण्यासाठी गेलेल्या १३ वर्षीय मुलीचा विहिरीत पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दुसरीकडे अश्या पद्धतीने पाणी वाया जात असल्याचे समोर आल्यावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पाणी जपून वापरा हे सांगणाऱ्या प्रशासनाने आधी पाण्याचा अपव्यय थांबवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. धुळे महापालिकेच्या जुन्या इमारतीत पाण्याची पाईपलाईन फुटण्याच्या घटना वारंवार घडतात. याला जबाबदार प्रशासन असल्याचादेखील आरोप नागरिकांनी केला आहे.