ETV Bharat / state

धुळे : पांझरा नदीवरील मध्यम प्रकल्प व जामखेली धरणातून पाण्याचा विसर्ग - Akkalpada Dam

पांझरा नदीवरील मध्यम प्रकल्पातून आणि जामखेली धरणातून रविवारी पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

पांझरा नदी
author img

By

Published : Aug 4, 2019, 8:20 PM IST

धुळे - मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाढ झाली आहे. रविवारी दुपारी पांझरा नदीवरील मध्यम प्रकल्पातून ७ हजार २६० आणि जामखेली धरणातून ४ हजार ६८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे पांझरा नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पांझरा नदीवरील मध्यम प्रकल्प व जामखेली धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. शनिवारी आणि रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. या पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये पाणी साठा वाढला आहे. साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून कान नदीला पूर आला आहे. या पावसामुळे साक्री तालुक्यात जनजीवन विस्कळीत झाले असून कबऱ्याखडक धरण आणि मालनगाव येथील धरण ओव्हरफ्लो भरून वाहू लागले आहेत. तसेच साक्री तालुक्यातील दहिवेल गावाला जोडणाऱ्या मुख्य पुलावरुन पाणी वाहत आहे.

सततच्या पावसामुळे साक्री तालुक्यातील सामोडे गावाजवळ असलेला गंगेश्वर मंदिराचा दरवाजा बुडाला आहे. नागरिकांना याठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. रविवारी दुपारी अक्कलपाडा धरणातून तसेच पांझरा नदीवरील मध्यम प्रकल्प आणि जामखेली धरणातून पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

Intro:धुळे जिल्हयात रात्रभर पावसाची संततधार सुरु असून यामुळे जिल्ह्यातील जलसाठयांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची वाढ झाली आहे. रविवारी दुपारी अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला तसेच पांझरा नदीवरील मध्यम प्रकल्प आणि जामखेली धरणातून पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे पांझरा नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. Body:धुळे जिल्ह्यात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरु आहे. रात्रभर आणि रविवारी दिवसभर पावसाची संततधार सुरु होती. या पावसामुळे जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये पाणी साठा वाढला असून साक्री तालुक्यातील लाटीपाडा धरण पूर्ण क्षमतेने भरले असून आणि कान नदीला देखील पूर आला आहे. या पावसामुळे साक्री तालुक्यात जनजीवन विस्कळीत झालं असून कबऱ्याखडक धरण आणि मालनगाव येथील धरण ओव्हरफ्लो भरून वाहू लागले आहेत. तसेच साक्री तालुक्यातील दहिवेल गावाला जोडणाऱ्या मुख्य पुलावरून पाणी वाहत असून नदीलगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे साक्री तालुक्यातील सामोडे गावाजवळ असलेला गंगेश्वर मंदिराचा दरवाजा पूर्णपणे पाण्यात बुडाला असून नागरिकांना याठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच रविवारी दुपारी अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला तसेच पांझरा नदीवरील मध्यम प्रकल्प आणि जामखेली धरणातून पांझरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पांझरा नदीवरील मध्यम प्रकल्पातून रविवारी दुपारी ७ हजार २६० आणि जामखेली धरणातून ४ हजार ६८७ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. यामुळे पांझरा नदीवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.