ETV Bharat / state

धुळे जिल्ह्यात पाणी प्रश्न गंभीर, १५ गावांना ११ टँकरने पाणी पुरवठा - water issue

जिल्ह्यात यंदा सरासरी ७८ टक्के पाऊस झाला. मात्र, समाधानकारक पाऊस होऊन देखील धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर या तालुक्यातील काही गावांमध्ये मार्च महिन्यातच भीषण पाणी टंचाई जाणवायला सुरवात झाली आहे.

पाणी टंचाई
author img

By

Published : Mar 14, 2019, 6:06 PM IST

धुळे - जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला आहे. मात्र, मार्च महिना सुरू असतानाच तरी तालुक्यातील काही गावांमध्ये भीषण पाणी टंचाई जाणवत आहे. त्यामुळे येत्या काळात या गावांमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

जिल्ह्यात यंदा सरासरी ७८ टक्के पाऊस झाला. मात्र, समाधानकारक पाऊस होऊन देखील धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर या तालुक्यातील काही गावांमध्ये मार्च महिन्यातच भीषण पाणी टंचाई जाणवायला सुरवात झाली आहे. सध्या धुळे तालुक्यात १५ गावांमध्ये ११ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यंदा तीव्र उन्हाळा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात वाढ होऊ शकते.

याच पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यातील ७७ विहिरी गावातल्या पाणी पुरवठ्यासाठी आणि १२ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यासोबत दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे विशेष दुरुस्ती योजना आणि अन्य गावांमध्ये तात्पुरत्या योजना राबविण्यात येत आहे.

Intro:धुळे जिल्ह्यात यंदा समाधानकारक पाऊस झाला असला तरी तालुक्यातील काही गावांमध्ये मार्च महिन्यातच भीषण पाणी टंचाई सुरु झाली आहे. सध्या धुळे तालुक्यात १५ गावांना ११ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. मात्र अन्य गावांमध्ये देखील येत्या काही दिवसात टँकरने पाणी पुरवठा केला जाऊ शकतो.
Body:
धुळे जिल्ह्यात यंदा सरासरी ७८ टक्के पाऊस झाला आहे. या पाऊसामुळे धुळे जिल्ह्यातील धरणं समाधानकारक भरले आहेत. साक्री तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. मात्र यंदा समाधानकारक परिस्थिती असून देखील धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर या तालुक्यात काही गावांमध्ये मार्च महिन्यातच भीषण पाणी टंचाई जाणवायला सुरवात झाली आहे. सध्या धुळे तालुक्यात १५ गावांमध्ये ११ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यंदा तीव्र उन्हाळा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात टँकरने पाणी पुरवठा करण्यात वाढ होऊ शकते. तसेच जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. त्यात ७७ विहिरी गावासाठी आणि १२ विहिरी टँकरसाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यासोबत दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याची समस्या सोडविण्यासाठी शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा येथे विशेष दुरुस्ती योजना आणि अन्य गावांमध्ये तात्पुरत्या योजना राबविण्यात येत आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.