ETV Bharat / state

धुळे लोकसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला, केवळ ५६.६८ टक्क्यांचीच नोंद - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

धुळे लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून या निवडणुकीत कोणाचा विजय होतो? आणि कोणाला फटका बसू शकतो? हा येत्या २३ मे'ला मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

मतदानाचा हक्क बजावताना डॉ. सुभाष भामरे
author img

By

Published : Apr 30, 2019, 6:15 PM IST

धुळे - नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत धुळे मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचे दिसून आले. यंदाच्या निवडणुकीत फक्त ५६.६८ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत ५८.६० टक्के मतदान झाले होते. मात्र, आता मतदानात झालेली घट कुणाच्या पथ्यावर पडणार हे २३ मे'लाच ठरणार आहे.

ईटीव्ही भारतच्या प्रतिनीधीने राजकीय विश्लेषकांसोबत केलेली चर्चा

संपूर्ण व्हिडीओ बघण्यासाठी इथं क्लिक करा...

धुळे लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी अर्थात शेवटच्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. धुळे लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा क्षेत्र येतात. या सगळ्या विधानसभा मतदार संघात एकूण १ हजार ९४० मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली.

विधानसभा मतदार संघनिहाय मतदानाची टक्केवारी -

  1. धुळे ग्रामीण - ६१. ८० टक्के
  2. धुळे शहर - ४९.०८ टक्के
  3. शिंदखेडा - ५७. ५५ टक्के
  4. मालेगाव मध्य - ५०. ३० टक्के
  5. मालेगाव बाह्य - ६४.३३ टक्के
  6. बागलाण - ६४.३३ टक्के

निवडणुकीच्या प्रचार काळात काय झालं?
धुळे लोकसभा मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि महाआघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्यात लढत होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विकासाच्या मुद्यांवर चर्चा होणे आणि मतदार संघाच्या विकासाचा मुद्दा जनतेपर्यंत पोहचवणे अपेक्षित होते. याउलट आरोप प्रत्यारोप जास्त होताना दिसत होते. यामुळे विकासाचा अजेंडा जनतेपर्यंत न पोहोचल्याने जनतेमध्ये नाराजीचा सूर होता.

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित होते?
धुळे लोकसभा मतदार संघात अनेक प्रश्न असून याठिकाणी शेती, सिंचन आणि बेरोजगारीचा विषय खूप मोठा आहे. तसेच कांदा आणि डाळींब या पिकांच्या हमीभावाचा प्रश्नदेखील मोठा आहे. तसेच गुन्हेगारी, शिक्षण, अशा विविध प्रश्नांबाबत आगामी काळात आपण काय करणार आहोत? तसेच मतदार संघाचा विकास करण्यासाठी कोणते प्रयत्न करणार आहोत? याबाबत चर्चा होणे गरजेचे होते. मात्र, यापैकी काहीही न झाल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.

जातीय समीकरण आणि त्यांचा होणार उमेदवारांना फायदा नेमका कसा असेल?
गेल्या निवडणुकीच्या वेळी धुळे लोकसभा मतदार संघात अमरीश पटेल आणि भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांच्यात लढत होती. मात्र, डॉ. भामरे हे मराठा समाजाचे असल्याने मतविभाजनाचा धोका नव्हता. मात्र, यंदाच्या निवडणुकीत डॉ. सुभाष भामरे आणि आमदार कुणाल पाटील यांच्यात लढत असल्याने यंदा मतविभाजन होणार हे निश्चित आहे. यामुळे मराठा आणि पाटील समाजाचे जास्तीत जास्त मतविभाजन झाले आहे. याचा फायदा हा नेमका कुणाला होतो? हे बघणे महत्वाचे असणार आहे. तसेच मालेगावमधील मुस्लीम समाजाचे मतविभाजन हे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

अनिल गोटे यांच्या बंडखोरीचा फायदा नेमका कुणाला?
भाजपचे बंडखोर आमदार आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार आमदार अनिल गोटे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करत आपली उमेदवारी जाहीर केली. अनिल गोटे यांना मिळणारी मत कोणाच्या पथ्यावर पडतात आणि कोणाचा फायदा होईल? हेदेखील बघणे महत्वाचे असणार आहे. अनिल गोटे यांच्या बंडखोरीचा फटका हा डॉ. सुभाष भामरे यांना बसू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

प्रचारात कोणते मुद्दे गाजले?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध विषयांवर आरोप प्रत्यारोप झाले. मात्र, या प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वाधीक राफेल घोटाळा, मनमाड इंदौर रेल्वेमार्ग, सुलवाडे जामफळ सिंचन योजना या विषयांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयांवर या निवडणुकीत सभेच्या माध्यमातून चर्चा झाली नाही.

एकंदरीतच धुळे लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून या निवडणुकीत कोणाचा विजय होतो? आणि कोणाला फटका बसू शकतो? हा येत्या २३ मे'ला मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

Intro:धुळे लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडली. धुळे लोकसभा मतदार संघासाठी एकूण ५६. ६८ टक्के मतदान झालं. गेल्या २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी धुळे लोकसभा मतदार संघासाठी ५८.६० टक्के मतदान झालं होत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी घसरल्याने याचा नेमका फायदा कुणाला होतो आणि धुळे लोकसभा मतदार संघातून कोणाचा विजय होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
Body:धुळे लोकसभा मतदार संघासाठी सोमवारी अर्थात शेवटच्या टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली. धुळे लोकसभा मतदार संघात ६ विधानसभा क्षेत्र येतात. या सगळ्या विधानसभा मतदार संघात एकूण १ हजार ९४० मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया किरकोळ अपवाद वगळता शांततेत पार पडली. धुळे लोकसभा मतदार संघासाठी एकूण ५६.६८ टक्के इतकं मतदान झालं. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाची टक्केवारी घसरल्याचं दिसून आलं. २०१४ साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी धुळे लोकसभा मतदार संघात ५८. ६० टक्के मतदान झालं होत. या मतदानाचा फायदा नेमका कुणाला होतो हे २३ मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात स्पष्ट होणार आहे.

कोणत्या विधानसभा मतदार संघात किती टक्के मतदान झालं ?

धुळे ग्रामीण - ६१. ८० टक्के
धुळे शहर - ४९.०८ टक्के
शिंदखेडा - ५७. ५५ टक्के
मालेगाव मध्य - ५०. ३० टक्के
मालेगाव बाह्य - ६४.३३ टक्के
बागलाण - ६४.३३ टक्के असे एकूण ५६. ६८ टक्के इतकं मतदान झालं.

निवडणुकीच्या प्रचार काळात काय झालं?

धुळे लोकसभा मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ सुभाष भामरे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार कुणाल पाटील यांच्यात लढत होती. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे तसेच मतदार संघाच्या विकासाचा मुद्दा जनतेपर्यंत पोहचविणे अपेक्षित असतांना याठिकाणी मात्र आरोप प्रत्यारोप जास्त होतांना दिसत होते. यामुळे विकासाचा अजेंडा जनतेपर्यंत न जनतेमध्ये नाराजीचा सूर होता.

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित होते ?

धुळे लोकसभा मतदार संघात अनेक [प्रश्न असून याठिकाणी शेतीचे, सिंचनाचे आणि बेरोजगारीचा विषय हा खूप मोठा आहे. तसेच कांदा आणि डाळिंब या पिकांच्या हमीभावाचा प्रश्न देखील मोठा आहे. तसेच गुन्हेगारी, शिक्षण अश्या विविध प्रश्नांबाबत आगामी काळात आपण काय करणार आहोत तसेच मतदार संघाचा विकास करण्यासाठी कोणते प्रयत्न करणार आहोत याबाबत चर्चा होणे गरजेचे होते , मात्र यापैकी काहीही न झाल्याने मतदारांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला.

जातीय समीकरण आणि त्यांचा होणार उमेदवारांना फायदा नेमका कसा असेल ?

गेल्या निवडणुकीच्या वेळी धुळे लोकसभा मतदार संघात अमरीश पटेल आणि भाजपचे डॉ सुभाष भामरे यांच्यात लढत होती. मात्र डॉ भामरे हे मराठा समाजाचे असल्याने मतविभाजनाचा धोका नव्हता मात्र यंदाच्या निवडणुकीत डॉ सुभाष भामरे आणि आ कुणाल पाटील यांच्यात लढत असल्याने यंदा मतविभाजन होणार हे निश्चित आहे. यामुळे मराठा आणि पाटील समाजाचं जास्तीत जास्त मतविभाजन झालं आहे, याचा फायदा हा नेमका कुणाला होतो हे बघणं महत्वाचं असणार आहे. तसेच मालेगाव मधील मुस्लिम समाजाचं मतविभाजन हे या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

अनिल गोटे यांच्या बंडखोरीचा फायदा नेमका कुणाला ?

भाजपचे बंडखोर आमदार आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले अपक्ष उमेदवार आ अनिल गोटे यांनी पक्षाच्या विरोधात जाऊन बंडखोरी करत आपली उमेदवारी जाहीर केली. अनिल गोटे यांना मिळणारी मत कोणाच्या पथ्यावर पडतात आणि कोणाचा फायदा होईल हे देखील बघणं महत्वाचं असणार आहे. अनिल गोटे यांच्या बंडखोरीचा फटका हा डॉ सुभाष भामरे यांना बसू शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

प्रचारात कोणते मुद्दे गाजले ?

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान विविध विषयांवर आरोप प्रत्यारोप झाले. मात्र या प्रचाराच्या रणधुमाळीत सर्वाधिक राफेल घोटाळा, मनमाड इंदौर रेल्वेमार्ग, सुलवाडे जामफळ सिंचन योजना या विषयांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही विषयांवर या निवडणुकीत सभेच्या माध्यमातून चर्चा झाली नाही.

एकंदरीतच धुळे लोकसभा मतदार संघात चुरशीची लढत झाली असून या निवडणुकीत कोणाचा विजय होतो आणि कोणाला फटका बसू शकतो हा येत्या मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.