धुळे - जिल्ह्यातील मालपूर येथे लांडग्याच्या हल्ल्यात दोन गायी आणि वासरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.
मालपूर येथील शेतकरी शेखर काशिनाथ धनगर यांच्या शेतातील गायी व शेंळ्यावर आज सकाळी लांडग्याने अचानक हल्ला केला यात २ गायी व एक वासरु जागीच मरण पावले व एक वासरू या लांडग्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झाले आहे.
नागरिकांच्या लक्षात ही बाब येताच या घटनेची माहिती वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचून या घटनेचा पंचनामा केला. आधीच दुष्काळात होरपळलेल्या आणि नापिकीस कंटाळलेल्या शेतकऱ्याच्या नशिबी जंगली प्राण्यांचे देखील संकट वाढले आहे. या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करून या घटनेत शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी या त्रस्त शेतकऱ्याने केली आहे.